Army jeep overturns near Longewala, Jaisalmer — Major TC Bhardwaj killed, three senior officers injured. saam tv
देश विदेश

Army Jeep Accident: लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; वळणावरून जाताना जीप उलटली, मेजरचा मृत्यू

Army Jeep Accident: राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात लष्कराच्या जीपला भीषण अपघात झालाय. या अपघातात मेजर टीसी भारद्वाज यांचा मृत्यू झाला, तर एक लेफ्टनंट कर्नल, दोन मेजर आणि चालक गंभीर जखमी झालेत.

Bharat Jadhav

  • राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात लष्कराच्या जीपचा भीषण अपघात झाला.

  • या अपघातात मेजर टी. सी. भारद्वाज यांचा मृत्यू झाला.

  • लेफ्टनंट कर्नल, दोन मेजर आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात लष्कराच्या जीपला भीषण अपघात झाला आहे. लष्कराची जीप उलटल्याने एका मेजरचा मृत्यू झालाय तर या अपघातात लेफ्टनंट कर्नल आणि दोन मेजरसह चार जण जखमी झालेत. तनोट पोलिस स्टेशन स्टेशनच्या परिसरातील रामगड आणि लोंगेवाला दरम्यान असलेल्या गमनेवाला गावाजवळ हा अपघात झालाय.

या अपघातात जमखी झालेल्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रस्ता वळणचा होता, परंतु जिप्सी जीप वळू शकली नसल्यानं ती उलटली, अशी माहिती तनोट पोलिस स्टेशनचे एएसआय अचलराम यांनी दिली.

जिप्सीचं नियंत्रण सुटलं

वृत्तानुसार गेल्या रविवारी संध्याकाळी चार लष्करी अधिकारी एकाच जिप्सीमधून लोंगेवालाकडे जात होते. गमनेवाला गावाजवळ जिप्सी गाडीचे नियंत्रण सुटल्यानं जीप उलटली. या अपघातात लेफ्टनंट कर्नल प्रशांत राय (३२), मेजर टीसी भारद्वाज (३३), मेजर अमित (३०), मेजर प्राची शुक्ला आणि चालक नसिरुद्दीन जखमी झालेत. जखमींना लष्कराच्या वाहनातून रामगड रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान मेजर टीसी भारद्वाज यांचा मृत्यू झाला. इतर जखमींना प्राथमिक उपचार देऊन लष्कराच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

मेजर अमित यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. मेजर प्राची शुक्ला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर चालक नसिरुद्दीन यांचा डावा कान कापला गेलाय. या सर्वांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

Shocking: अश्लिल व्हिडिओ पाहून ठेवायचा शरीरसंबंध, बायकोची सटकली; प्रायव्हेट पार्ट दाबून नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT