43-Year-Old’s Letter to Former BJP MLA Viral in Rajasthan Saam
देश विदेश

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

43-Year-Old’s Letter to Former BJP MLA Viral in Rajasthan: जयपूरमधील ४३ वर्षीय कैलास शर्मा याने माजी भाजप आमदाराला पत्र लिहिलं. या पत्रातून त्यानं लग्न लावून देण्यासाठी मदत मागितली.

Bhagyashree Kamble

जयपूरमधील चौमूं येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. लग्न ठरत नसल्यामुळे एका पठ्ठ्यानं भाजप पक्षातील माजी आमदाराला पत्र लिहिलं. तसेच पत्रात लग्न करण्यास मदत करण्याची विनंती केली. पठ्ठ्यानं लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पत्रावर अनेकांनी कमेंट करून व्हायरल केले आहे. या पत्रात तरूणानं त्याचा मोबाईल नंबर देखील समाविष्ट केले आहे.

कैलास शर्मा (वय वर्ष ४३) असे तरूणाचे नाव आहे. त्याने लग्न करण्यासाठी मदत करणारं पत्र लिहून भाजप पक्षातील माजी आमदार रामलाल शर्मा यांना पाठवलं. तसेच लग्न करण्यास मदत करण्याची विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास शर्मा हा चौमूं येथील चितवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी पत्रात म्हटलं की, 'सर, मी २-३ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुमचे एक विधान ऐकले होते. ज्यात तुम्ही ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित तरूणांसाठी लग्न लावण्याबद्दल बोलत होते'.

'मी ४३ वर्षांचा आहे. अजूनही मी अविवाहित आहे. कृपया माझे लग्न लावून देण्यास मदत करा', अशी विनंती त्या तरूणानं पत्राद्वारे केली. या पत्रात त्यानं शेवटी स्वत:चा नंबर देखील समाविष्ट केला. कैलास शर्माने लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

खरंतर नुकताच चौमूंमध्ये एक सामूहिक विवाह सोहळा पार पडला. जिथे अनेक जोडप्यांचा लग्न सोहळा पार पडला. चौमूं येथील माजी आमदार आणि भाजप नेते रामलाल शर्मा यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी अविवाहित लोकांसाठी विधान केलं होतं. यानंतर कैलास शर्माने त्यांना पत्र लिहून पाठवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या पत्रावर माजी आमदार रामलाल शर्मा यांच्याकडून औपचारिक प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु, चौमुंमध्ये या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT