indigo flight emergency landing
indigo flight emergency landing Saam TV
देश विदेश

Shocking News: थरारक! १७ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन फेल; १६० प्रवासी मृत्यूच्या दाढेतून परतले!

Satish Daud-Patil

indigo flight emergency landing

देव तारी त्याला कोण मारी, अशी मराठीत म्हण आहे. अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अनेकजण देवाचा धावा करतात. त्यातच दैव बलवत्तर असेल, तर मृत्यूचा देखील पराभव होऊ शकतो. याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण भरलं खरं, पण १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक इंजिन फेल झालं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंजिन फेल झाल्याचं कळताच विमानातील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, पायलटने सतर्कता दाखवत विमानाचे इमर्जन्सी सुरक्षित लँडिंग केले. मृत्यूच्या दाढेतून परतताच विमानातील १६० प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. (Latest Marathi News)

अंगावर काटा आणणारा हा थरार जयपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विशेष बाब म्हणजे, याआधीही इंडिगो विमानासोबत अशी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीच्या विमानाने सोमवारी सायंकाळी जयपूरहून कोलकात्याला जाण्यासाठी उड्डाण भरले. या विमानातून १६० प्रवासी प्रवास करीत होते. विमान १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक पक्षी आदळल्याने इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली.

ही बाब लक्षात येताच पालयटने प्रवाशांना सतर्क केले. दरम्यान, वैमानिकाने हवाई वाहतूक सेवेशी तत्काळ संपर्क साधला आणि विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करत जयपूर विमानतळावर परत आणले. विमानतळावर आपत्कालीन लँडिंग होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Today's Marathi News Live: मान्सून आज अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT