CCTV Footage  Saam Tv
देश विदेश

Shocking CCTV Footage : जयपूरमध्ये क्षुल्लक कारणावरुन तरुणीला कारखाली चिरडलं; घटनेचा VIDEO आला समोर

Jaipur Crime News: जयपूरमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने शुल्लक कारणावरुन तरुणीला चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jaipur Crime A Man Crushed Girl By Car CCTV Footage:

जयपूरमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने शुल्लक कारणावरुन तरुणीला चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. आरोपीने मृत तरुणीच्या मित्रालाही कारने उडवले. जयपूरच्या जवाहर सर्कल पोलीस स्टेशन परिसरातील एव्हरलँड हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, उमा सुथार असे मृत मुलीचे नाव आहे. तर आरोपी तरुणाचं नाव मंगेश अरोरा असं नाव आहे. मंगेश कपड्यांचा व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे. मंगेश ख्रिसमस पार्टीनिमित्त आपल्या मित्रांसोबत एव्हरलँड हॉटेल परिसरात आला होता. उमा देखील तिच्या मित्रासोबत तिथेच पार्टीनिमित्त आली होती.

ख्रिसमस पार्टीदरम्यान आरोपी मंगेशने उमाला उद्देशून केलेल्या कमेंटवरुन दोघांमध्ये वाद झाला होता. दोघांमध्ये सुरु झालेला वाद पार्टीतून बाहेर आल्यानंतरही सुरु होता. मंगेश नशेत असल्याने हा वाद अधिकच वाढला. उमाने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली. कॅब देखील आली होती. मात्र मंगेशने रागाच्या भरात उमाच्या कॅबचा आरसा फोडला.

त्यानंतर मंगेश आपल्या मैत्रिणीसोबत कारमध्ये बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उमा आणि तिच्या मित्राने कार समोर येऊन त्याला थांबवून जाब विचारण्याच्या प्रयत्न गेला. मात्र मद्यधुंद मंगेशने कुठलाही विचार न करता दोघांवर वेगाने कार चढवली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मंगेशला देखील अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT