Jahangirpuri Violence Saam Tv
देश विदेश

जहांगीरपुरी हिंसाचारावर कोर्ट म्हणाले- दिल्ली पोलिस 'पूर्णपणे अपयशी'

हनुमान जन्मोत्सवादरम्यान जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची सोमवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली

साम टीव्ही ब्युरो

जहांगीरपुरी: हनुमान जन्मोत्सवादरम्यान जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या (violence) प्रकरणाची सोमवारी दिल्ली (Delhi) न्यायालयात (court) सुनावणी झाली. अनधिकृत मिरवणूक रोखण्यात दिल्ली पोलीस पूर्णपणे अपयशी ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जामीनासाठी अनेक याचिका फेटाळताना न्यायालयाने हे सांगितले आहे की, या मिरवणुकीदरम्यान परिसरात जातीय हिंसाचार उसळला आहे.

हे देखील पाहा-

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून यात पोलिसांचा (police) हातखंडा असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश गगनदीप सिंग म्हणाले आहे की, "वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.

पोलिसांची भूमिका समाधानकारक नाही- न्यायालय

न्यायमूर्ती गगनदीप सिंग यांनी बेकायदेशीर कारवाया रोखण्यात पोलिसांची भूमिका ‘समाधानकारक नाही’ असे म्हटले आणि त्यांचा काही सहभाग असेल तर त्याचीही चौकशी व्हायला हवी. ७ मे रोजी दिलेल्या आदेशाची प्रत पोलीस आयुक्तांना माहिती व उपाययोजना करण्यासाठी पाठवावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती गगनदीप सिंह म्हणाले, "राज्याने हे मान्य करणे योग्य आहे की शेवटची मिरवणूक बेकायदेशीर होती आणि त्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही." १६ एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या घडामोडी आणि दंगल रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात स्थानिक प्रशासनाची भूमिका याची चौकशी करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT