Jabalpur Railway Station Viral Video 
देश विदेश

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

Jabalpur Railway Station Viral Video : जबलपूर रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घडली आहे. त्याला कारण फक्त समोसा ठरला आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

Namdeo Kumbhar

Railway vendor abuses passenger over samosa payment : रेल्वे स्टेशनवर दिवाळीत आपल्याला गर्दी तर दिसतेच. पण त्याशिवाय चहा, भजी, समोसा अन् अनेक वस्तू विकणारे वेंडरही फिरत असतात. एक्सप्रेस अथवा ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर अनेकजण खाली उतरतात अन् खाण्यासाठी काहीतरी घेत असतात. असाच प्रसंग जबलपूर स्थानकात घडलाय. होय. एक व्यक्ती ट्रेनमधून समोसा घेण्यासाठी खाली उतरला. तो ऑनलाईन पैसे पाठवत होता, पण सर्व्हर डाऊन असल्याने व्यवहार होत नव्हता. तो पैसे देण्याचा प्रयत्न करतच होता, पण तेवढ्यात ट्रेन निघाली. दिवाळीसाठी घरी जायला निघालेली ट्रेन सुटते की काय,.. असं वाटल्याने तो धावत सुटला.. पण त्या वेंडरने त्याची कॉलर पकडली अन् दोन-चार शिव्या हासडल्या. पैसे दे.. असे म्हणत त्या मुलावर शिव्यांची सरबती केली. मुलाने आपली ट्रेन सुटेल त्यामुळे नाइलाजास्तव हातामधील घड्याळ काढून दिले अन् धावत ट्रेन पकडली. (Jabalpur railway station viral video today)

जबलपूर रेल्वे स्टेशनवरील या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या एक्स अन् इतर सोशल मीडियावर चर्चेत आहे. वेंडरच्या वागणुकीवर अनेकांनी टीका केली आहे. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जबलपूर DRM याने याची दखल केली. त्या विक्रेत्याचा शोध घेण्यात आला अन् त्याला ताब्यात घेतले. त्या विक्रेत्याचे लायसन रद्द करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

रेल्वे प्लॅटफॉर्म सोडून निघत आहे. प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी धावत आहे. त्यामध्ये एक युवकही धावताना दिसतोय. पण प्लॅटफॉर्मवर समोसा विकणारा विक्रेता त्या मुलाची कॉलर पकडतो अन् पैशांची मागणी करतो. तरूण बारकोड स्कॅन करतो, पण पेमेंट पूर्ण होत नाही. त्यावेळी तो म्हणतो मला समोसा नकोय.. माझी ट्रेन सुटेल जाऊ द्या.. त्यावर वेंडरकडून शिव्या दिल्या जातात. त्यावर मुलगा आपल्या हातामधील घड्याळ देतो अन् धावत जाऊन गाडी पकडतो.

जबलपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, विक्रेत्याच्या वागणुकीवर अनेकांनी टीकेची झोड उडवली आहे. डीआरएम जबलपूरने कारवाई केली. त्याला ताब्यात घेतलं असून लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती डीऐरएमकडून सोशल मीडियावर देण्यात आली आहे. मुलासोबतच्या त्या वागणुकीवरून एक्सवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. या व्हिडिओला ४,८०,००० व्ह्यूज आणि जवळपास ४,००० लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT