Chandrayaan 3 News Update Saam Tv
देश विदेश

Chandrayaan-3 News: गुड न्यूज! चांद्रयान-3 ने टिपला चंद्राचा पहिला फोटो, इस्रोने जारी केला व्हिडीओ...

Chandrayaan 3 News Update: गुड न्यूज! चांद्रयान-3 ने टिपला चंद्राचा पहिला फोटो, इस्रोने जारी केला व्हिडीओ...

Satish Kengar

Chandrayaan 3 News Update: चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी इस्रोने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये 'चांद्रयान-3' मधून चंद्राचे फोटो दाखवण्यात आले आहेत.

इस्रोने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, 'चांद्रयान-3' मोहिमेतील चंद्राचे दृश्य, जेव्हा ते 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत स्थापित झाले होते.

व्हिडीओच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या फोटोमध्ये चंद्र निळ्या-हिरव्या रंगात दिसत आहे. चंद्रावर अनेक खड्डेही दिसत आहे. आज चांद्रयान चंद्राच्या आणखी जवळ जाणार आहे. चांद्रयान सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून 170 किमी x 4313 किमी अंतरावर आहे.

याआधी शुक्रवारी म्हणजेच 4 जुलै रोजी चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त अंतर कापले होते. एका दिवसानंतर म्हणजे 5 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.  (Latest Marathi News)

चांद्रयान-3 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास तिसऱ्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर 14 ऑगस्टला चौथ्या आणि 16 ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाचा माज काही तासांतच उतरला; कान पकडून मागितली माफी

Mirchi Vada: नाश्त्याला वडापाव कशाला? घरगुती अन् राजस्थान स्टाईल कुरकुरीत मिरची वडा ठरेल बेस्ट ऑप्शन

१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

Karnataka Politics : सत्तासंघर्ष पेटला! मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? कर्नाटकात 'डीके बॉस'!

Maharashtra Live News Update : देवळीतील भाजपाची विजय संकल्प सभा

SCROLL FOR NEXT