ISRO  
देश विदेश

ISRO ने इतिहास रचला! वजनदार सॅटेलाइट केला लाँच, मोबाइल नेटवर्कमध्ये बदल होणार

ISRO launches heaviest satellite using LVM-3 rocket : इस्रोने LVM-3 बाहुबली रॉकेटद्वारे 6,100 किलो वजनाचा ब्लूबर्ड ब्लॉक-२ सॅटेलाइट यशस्वीपणे लाँच केला आहे.

Namdeo Kumbhar

ISRO satellite launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून बुधवारी सकाळी ८.५४ वाजता ब्लूबर्ड ब्लॉक-२ रॉकेट लाँच केले. यामुळे काही दिवसात मोबाईल नेटवर्कमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भविष्यात मोबाईल टॉवर इतिहासजमा होऊ शकतात असा दावा केला जात आहे. ब्लूबर्ड ब्लॉक-२ या अमेरिकेच्या नवीन पिढीच्या कम्युनिकेशन सॅटेलाइटला अवकाशात नेहण्यासाठी भारताच्या शक्तिशाली LVM-M6 याचा वापर करण्यात आला.

भारतीयांसाठी हा अभिमानाचा अन् आनंदाचा क्षण आहे. या शक्तिशाली रॉकेट लाँचिंगमुळे भारत जगात नव्या उंचीवर पोहचणार आहे. अमेरिकेच्या ब्लूबर्ड ब्लॉक-२ या कम्युनिकेशन सॅटेलाइटला अवकाशात नेण्यासाठी इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM-3 लाँच करण्यात आले. LVM-3 या शक्तिशाली रॉकेटला बाहुबली म्हणूनही ओळखले जाते. या रॉकेटमध्ये सर्वात जड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची क्षमता आहे. आजचे मिशन LVM-3 चे सहावे यशस्वी उड्डाण ठरलेय.

न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि यूएसमधील एएसटी स्पेसमोबाइल यांच्यातील झालेल्या व्यावसायिक करारांतर्गत आज सकाळी सॅटेलाईट लाँचिंग झाले. LVM3 च्या प्रक्षेपण इतिहासात लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये ठेवण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार (६,१०० किलो) पेलोड आहे. या लाँचिंगच्या आधी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली. याआधी ४,४०० किलो वजनाचा सॅटेलाइट वाहून नेहण्यात आला होता. त्याचे २ नोव्हेंबर रोजी इस्रोने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.

आज सकाळी लाँच केलेला सॅटेलाईट हा इस्रोच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि एएसटी स्पेसमोबाइल यांच्यातील झालेल्या कराराचा भाग होता. ६०० किमी उंचीवर तैनात केलेले हे ऐतिहासिक मिशन जगभरातील स्मार्टफोनवर थेट हाय-स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी डिझाइन केलेय. या मिशनमुळे मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. कारण, ब्लूबर्ड ब्लॉक-२ मोहिमेचा उद्देश उपग्रहाद्वारे थेट मोबाइल कनेक्टिव्हिटी देणे हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT