iran’s Supreme Leader Ayatollah Ali Khamenei as reports claim Israel–US strikes targeting top Iranian leadership. 
देश विदेश

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

Ayatollah Khamenei on Israel–America Radar: इस्त्रायल-अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेईंचा खात्मा करण्याची योजना आखलीय. त्यासाठी खामेनेईंच्या घरावर हल्ला केलाय. मात्र, खोमेनींना टार्गेट का केलं जातंय, त्याबाबत ट्रम्प आणि नेतान्याहूंनी काय इशारा दिलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • स्त्रायल-अमेरिकेकडून इराणच्या सर्वोच्च नेत्यांना टार्गेट केल्याचा दावा.

  • ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत मिसाईल हल्ल्यांची माहिती.

  • वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा दावा.

रोहित कदम, साम प्रतिनिधी

इस्त्रायल-अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी राबवत इराणवर जोरदार मिसाईल हल्ले सुरु केले आणि मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला. यात अमेरिका आणि इस्त्रायलने थेट इराणचे सर्वेसर्वा आयातुल्लाह खोमेनी आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना टार्गेट केलंय.. अमेरिकेनं खोमेनींच्या घरावर हल्ला करत खामेनेईंचे वरिष्ठ राजकीय सल्लागार अली शामखानी आणि इराणी रिव्हॉल्यूशनरी गार्डच्या टॉप कमांडरचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय.

अयातुल्लाह खोमेनींच्या सत्तेला हादरे

इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कमांडर जनरल मोहम्मद पाकपौर ठार

इराणचे लष्करप्रमुख जनरल अमीर हातामी ठार झाल्याची शक्यता

दरम्यान, "शस्त्रे खाली ठेवा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा", असा थेट इशारा याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींना दिलाय.

दुसरीकडे इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेत्यान्याहू यांनीही इराणने अणू कार्यक्रम थांबवला नाही तर विध्वंस घडवण्याचा इशारा दिलाय. आता इस्त्रायल-अमेरिकेनं इराणविरोधात छेडलेलं युद्ध हे खोमेनींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आणि इराणचा अणू कार्यक्रम बंद पाडण्यासाठी असल्याचं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी म्हटलंय.

अमेरिका–इराण अणू करारावरील मतभेदांनंतर तणाव तीव्र झाला असतानाच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यावेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी तेहरानमध्ये उपस्थित नव्हते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आधीच एका अज्ञात आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मात्र इस्त्रायल आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना आता खोमेनींचा पत्ता शोधून त्यांचा खात्मा करणार का? आणि इराणमधील खोमेनींची राजवट उलथवून टाकणार की इराण कडवी झुंज देत अमेरिका आणि इस्त्रायलचे मनसुबे उधळून लावणार... याकडे जगाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT