Israel Third airstrikes on hamas 900 people died many houses ruled Saam TV
देश विदेश

Israel-Hamas War: इस्रायलकडून तिसऱ्यांदा एअर स्ट्राईक, हमासची 2200 ठिकाणं उद्ध्वस्त; 3000 लोकांचा मृत्यू

Israel-Hamas War Updates: बुधवारी पहाटेच्या सुमारास इस्रायलने पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव करत अनेक ठिकाणे उध्वस्त केली.

Satish Daud

Israel-Hamas War Latest Updates

इस्रायल आणि हमासमध्ये घमासान युद्ध सुरू असून दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास इस्रायलने पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव करत अनेक ठिकाणे उध्वस्त केली. यामध्ये हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद दायिफ यांच्या वडिलांचे घराचाही समावेश आहे. एएनआयने द टाईम्स ऑफ इस्रायलच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

एएनआयच्या वृत्तानुसार, इस्रायलने आतापर्यंत हमासच्या 2200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. याशिवाय इस्रायलच्या हवाई दलाने हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद दायिफ यांच्या वडिलांचे घरही उद्ध्वस्त केले. डायफ हा इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे.

हमास आणि इस्रायल युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला, लहान मुले, तसेच वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर हजारो लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय इस्त्रायली सैन्याने आपल्या भागात 1500 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तत्पुर्वी हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते.याशिवाय हमासचे हजारो दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले होते. त्यांनी नि:शस्त्र इस्रायली लोकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हमासच्या स्थानांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या सततच्या गोळीबारामुळे हमास हादरवून गेला आहे. आतापर्यंत हमासमधील शेकडो इमारती उध्वस्त झाल्या असून सर्वत्र केवळ ढिगारा आणि धूर दिसत आहे. हमासकडून युद्ध थांबण्याची विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वंचित बहुजन आघाडीच्या आक्रोश मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT