israel hamas war 20 year old indian origin soldiers killed in gaza attack Saam TV
देश विदेश

Israel-Hamas War: इस्राइल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या २० वर्षीय सैनिकाचा मृत्यू; गाझामध्ये बलिदान

Israel-Hamas War: गाझा येथे सुरू असलेल्या लढाईत भारतीय वंशाच्या २० वर्षीय इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

Israel-Hamas War Latest Updates

हमास आणि इस्राइल यांच्यात गेल्या २७ दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. इस्राइलकडून सातत्याने हमासवर हवाई हल्ले केले जात आहेत. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच गाझा येथे सुरू असलेल्या लढाईत भारतीय वंशाच्या २० वर्षीय इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हलेल सोलोमन (वय २० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या जवानाचं नाव आहे. (Israel-Hamas War) महापौर बेनी बिटन यांनी बुधवारी फेसबुकवर पोस्ट लिहत सोलोमन यांच्या मृत्युबाबतची माहिती दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बेनी बिटन म्हणतात, 'आज आमच्यासाठी दुःखद क्षण आहे. हमास या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या (Israel-Hamas War) लढ्यात आम्ही हलेल सोलोमन या २० वर्षीय जवानाला गमावलं आहे'.

'हलेल हा एक अज्ञाधारक मुलगा होता, ज्याला आपल्या पालकांबद्दल आदर होता. हलेलच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. हलेल हा एक अज्ञाधारक मुलगा होता, ज्याला आपल्या पालकांबद्दल आदर होता', असंही बेनी बिटन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इस्राइल-हमासमध्ये युद्धाचा भडका

७ ऑक्टोबर रोजी गाझा स्थित हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर ५ हजार रॉकेट डागले होते. यामध्ये शेकडो इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर इस्राइलने हमासला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा २७ वा दिवस आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस हे युद्ध भयंकर होत चाललं आहे. इस्राइल गाझामधील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इस्रायलने मंगळवारी गाझातील सर्वात मोठे निर्वासित शिबिर असलेल्या जबालियावर हवाई हल्ले केले. यामध्ये हमासचा कमांडर इब्राहिम बियारीसह सुमारे ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT