israel war  Saam tv
देश विदेश

इस्रायलचं 'लेझर' अस्त्र; 'आयर्न डोम'पेक्षा 'आयर्न बीम' विध्वसंक, वाचा स्पेशल रिपोर्ट

israel war : इस्रायलचं 'लेझर' अस्त्र आता शत्रूचा कर्दनकाळ ठरणार आहे. इराणला रोखण्यासाठी इस्रायलनं आयर्न बीमचा कसा वापर सुरु केलाय... आयर्न बीम किती विध्वसंक आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Girish Nikam

एक लेझर आणि मिसाईल उद्ध्वस्त...क्षेपणास्त्र नाही...ड्रोन नाही तर फक्त एका लेझरनं शत्रूचा खात्मा होणारय.....होय तुम्ही बरोबर ऐकताय....इस्रायलनं इराणविरोधात सगळ्यात विध्वसंक अशी एअर डिफेंस सिस्टम सक्रीय केलीय. आर्यन बीम.. केवळ एक प्रकाशझोत शत्रूला उद्धवस्त करेल....त्यामुळे इस्रायल इराणविरोधातील संघर्षात आयर्न बीमचा कसा वापर करणार करेल हे पाहूयात...

काय आहे आयर्न बीम?

युद्धभूमीत लेझर संरक्षण प्रणालीचा वापर करणारा इस्रायल जगातील पहिला देश असून या 'आयर्न बीम'मध्ये एनर्जी लेझर व्हेपन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. यात 100 किलोवॅटचा लेझर किरण वेगानं शत्रूवर मारा करतो. या आयर्न बीमची मारक क्षमता 10 किमीपर्यंत असून यात एअर डिफेंस रडार, लेझर जनरेटर आणि कमांड व्हेकलचा समावेश असून यात आर्यन बीममध्ये दारूगोळ्याचा मोठ्या प्रमाणात साठा करणं शक्य आहे.

लेझर बीम जनरेट करून 3 लाख किमी प्रति सेकंद वेगानं शत्रूवर हल्ला करणं शक्य आहे. तसंच आर्यन बीम शत्रूच्या रॉकेटचा शोध घेऊन थर्मल कॅमेरे लक्ष्यावर अचूक नजर ठेवतात आणि उष्णतेनं रॉकेटचे कवच वितळवून त्याला आकाशातच जाळून नष्ट करण्याची क्षमता यात आहे.

2014 मध्ये पहिल्यांदा इस्त्रायलनं आयर्न बीमची जगाला ओळख करून दिली. 10 वर्षाच्या रिसर्चनंतर सप्टेंबर 2025 मध्ये आयर्न बीमला ऑपरेशनसाठी सज्ज करण्यात आले... इस्त्रायलनं या तंत्रज्ञानाला विकसित करण्यासाठी 500 मिलियन डॉलर खर्च केलेत... युद्धभूमीवरही आयर्न डोमपेक्षा आर्यन बीम प्रभावशाली असल्याचं सिद्ध होतयं... 2 मार्चला IDF ने हिज्बुल्लाहचं रॉकेट आयर्न बीमने हवेतच नष्ट केल्याचंही सांगितलयं... त्यामुळे आयर्न बीमची लेझर प्रणाली युद्धाची दिशा बदलणारी असून ड्रोन युद्धाच्या युगात इस्त्रायलसाठी हे एक ब्रह्मास्त्र आहे... हे निश्चित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात धूळवडीला गालबोट,रावणवाडी जलाशयात बोट उलटली

Iran-US War: भारताचं मौन आगतिक की व्यवहारिक? इराणबाबत धोरणाचा भारताला फटका बसणार?

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

SCROLL FOR NEXT