Israel Hamas War Latest News  Saam TV
देश विदेश

Israel Hamas War: गाझामधील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलचा मोठा हल्ला; २५ पॅलेस्टिनी ठार, शेकडो जखमी

Israel Hamas War Latest News : इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी गाझाच्या दक्षिणेकडील शहर रफाहजवळील निर्वासितांच्या छावणीवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास २५ पॅलेस्टिनी ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत.

Satish Daud

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी गाझाच्या दक्षिणेकडील शहर रफाहजवळील निर्वासितांच्या छावणीवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास २५ पॅलेस्टिनी ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये लहान मुले, महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्याची माहिती दिली आहे. इस्त्रायलने हमासवर केलेला हा महिनाभरातील दुसरा हल्ला आहे. याआधी २६ मे रोजी इस्रायलने रफाह येथील शरणार्थी छावणीवर हवाई हल्ला केला होता.

या हल्ल्यात ४५ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश होता. हमाससाठी या जखमा ताज्यात असतानाच इस्त्रायलने पुन्हा एकदा रफाहजवळील निर्वासितांच्या छावणीवर मोठा हल्ला केला. यामध्ये २५ जण ठार झाले असून शेकडो जखमी झाले आहेत.

सीएनएनच्या वृत्तानुसार, गाझा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला एका निर्वासित छावणीवर झाला. इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या या भागांना लष्कराने सेफ झोन घोषित केले होते, मात्र जेव्हा विस्थापित लोकांना येथे ठेवण्यात आले तेव्हा त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. आयडीएफने असेही म्हटले आहे की, हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

इस्रायलने अनेकदा हमासच्या सैनिकांना आणि निष्पाप लोकांना लक्ष्य केल्याचा आरोप हमासने केला आहे. दुसरीकडे हमासचे अनेक दहशतवादी हे लोकांमध्ये राहून काम करतात. त्यामुळे हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गमवावा लागतो, असं इस्त्रायलने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आम्ही निर्वासितांच्या छावणीवर कोणताही बॉम्ब हल्ला केला नसल्याचं स्पष्टीकरण इस्त्रायलने दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT