Bodies of children and civilians arrive at Gaza hospitals after deadly overnight Israeli airstrikes; hopes for peace crushed as violence escalates. 
देश विदेश

Israel Airstrike : इस्रायलचा गाझावर पुन्हा हल्ला, ८१ जणांचा मृत्यू, ट्रम्प यांना जोरदार धक्का

Israeli airstrike on Gaza : इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात ८१ जणांचा मृत्यू झाला असून ६६ चिमुकल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे ट्रम्प यांचा युद्धविराम प्रयत्न धक्का बसला आहे. गाझामध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

Israel Gaza airstrike kills 81 including 66 children : इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर भीषण हल्ला केला आहे. या विध्वंसक हल्ल्यामध्ये ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६६ चिमुकल्याचा समावेश असल्याचे समजतेय. इस्रायलच्या हल्ल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या प्रयत्नाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामाचा करार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. युद्धविमाराची चर्चा सुरू असतानाच गाझावर इस्रायलने हल्ला केला आहे.

इस्रायलच्या गाझावरील हल्ल्यांमध्ये ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चिमुकल्यांचाही समावेश आहे. दक्षिण गाझातील खान युनिसजवळील मुवासी येथील छावणीवर जोरदार हल्ला केला, यामध्ये तीन मुलांसह त्यांच्या आई-वडिलांचाही मृत्यू झाला. गाढ झोपेत असताना हल्ला केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे गाझामधील तणाव आणखी वाढला आहे. त्याशिवाय युद्धविरामाच्या आशा आता धुसर झाल्याचे दिसतेय.

इस्रायलने शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत गाझा शहर आणि परिसरात सातत्याने हल्ले केले. गाझा शहरातील फिलिस्तीनी स्टेडियमजवळ झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला. या स्टेडियममध्ये निर्वासितांना प्रशासनाकडून आश्रय देण्यात आला होता, अशी माहिती शिफा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शिफा रुग्णालयात आणण्यात आले. तर नासिर रुग्णालयात 20 हून अधिक मृतदेह दाखल झाले. याशिवाय, शनिवारी दुपारी पूर्व गाझा शहरातील एका रस्त्यावर झालेल्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अल-अहली रुग्णालयात नेण्यात आले आहेत, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे गाझामधील स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीती पसरली आहे. मृत चिमुकल्याच्या आजी सुआद अबू तेइमा यांनी आक्रोश करत विचारले, “या निरपराध मुलांचा काय दोष? त्यांनी इस्रायलचा काय बिगाडलं होतं?” गाझातील नागरिक आधीच युद्धाच्या छायेत होते. त्यात इस्रायलने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे दैनंदिन जीवन आणखी कठीण झालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT