Israel–Hamas War Marathi News Saam TV
देश विदेश

Israel–Hamas War: इस्रायलचा हमासवर सर्वात मोठा हल्ला; गाझापट्टीत बॉम्बवर्षाव, आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू

Israel–Hamas War News: इस्रायलने रविवारी हमासच्या गाझापट्टीतील २०० हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

Israel–Hamas War Latest Updates

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे दोन्ही देशांमधील युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायलने रविवारी हमासच्या गाझापट्टीतील २०० हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले.

या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जखमी झाले आहेत. युद्धात इस्रायलचे १४ सैनिकही मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. हल्ल्यादरम्यान हमासच्या तळांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने रविवारी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हमासच्या स्थानांवरून सैनिकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याचं इस्रायलने (Israel–Hamas War) म्हटलं आहे. प्राप्त माहितीनुसार, उत्तर गाझामधील एका निवासी इमारतीत हमासने मोठा हल्ला करण्यासाठी शस्त्र लपवून ठेवली होती.

इस्रायली सैन्याने रविवारी या इमारतीला घेराव घातला. झडतीदरम्यान, त्यांना डझनभर स्फोटके, शेकडो ग्रेनेड आणि गुप्तचर कागदपत्रे जप्त केली. ही इमारत शाळा, दवाखाना आणि मशिदीच्या शेजारी होती.  (Latest Marathi News)

इस्त्रायली सैन्याने सांगितले की, दराज-तुफाहमधील कारवाईदरम्यान एका शाळेची झडती घेण्यात आली, ज्यामधून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली. यामध्ये हमासच्या नौदल कमांडो युनिटशी संबंधित रॉकेट आणि इतर उपकरणांचा समावेश होता.

उत्तर गाझामधील दुसर्‍या ऑपरेशन दरम्यान, इस्त्रायली सैनिकांना हमासचे काही दहशतवादी एका इमारतीत लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर लष्कराने या इमारतीवर बॉम्बचा वर्षाव केला. या हवाई हल्ल्यात इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली.

दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की याच काळात इस्रायली हल्ल्यात किमान १६६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ३८४ जखमी झाले. युद्धादरम्यान १४ इस्रायली सैनिकही मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT