Delhi Police Arrests ISIS module terrorist Rizwan ali from Delhi | दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली.  SAAM TV
देश विदेश

ISIS च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक; २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून झाला होता पसार

ISIS module terrorist Rizwan ali arrested by Delhi Police : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली. गेल्या वर्षी तो पुणे पोलिसांच्या तावडीतून निसटला होता.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाआधीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. आयसीस (ISIS) मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली. रिझवान अली असं या अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे.

स्वातंत्र्यदिनापूर्वीच मोठी कारवाई

राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटना आयसीसच्या मॉड्यूलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांच्या तावडीतून झाला होता पसार

अटक केलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान दिल्लीच्या दर्यागंज परिसरात राहत होता. आयसीसच्या पुणे मॉड्यूलचा तो म्होरक्या आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून तो निसटला होता. तेथून तो फरार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएसह बऱ्याच तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेल्या या दहशतवाद्यावर तीन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या आधीच रिझवानला झालेली अटक हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं मोठं यश मानलं जात आहे. दिल्ली पोलीस आणि एनआयएसह अनेक तपास यंत्रणा आता त्याची चौकशी करून संभाव्य कटाबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

शस्त्रासह २ मोबाइल जप्त

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी एनआयएकडून दहशतवादी रिझवान अली याच्याबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रात्री साधारण ११ वाजता दिल्लीच्या निकट गंगा बख्श मार्गाजवळून त्याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dandruff Free Hair: केसातील कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी वापरा 'हे' तेल, वाचा सोपे उपाय

Maharashtra Live News Update: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी शिवाजी पार्कात चाहत्यांची गर्दी

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

SCROLL FOR NEXT