Syria America Air Strike: सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या ठार Saam Tv
देश विदेश

Syria America Air Strike: सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या ठार

अमेरिकन हवाई दल, कमांडो आणि रीपर ड्रोन यांनी गुरुवारी सीरियामध्ये एक मोठी लष्करी कारवाई करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: अमेरिकन हवाई दल, कमांडो आणि रीपर ड्रोन यांनी गुरुवारी सीरियामध्ये (Syria) एक मोठी लष्करी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामिक स्टेटचा (( Islamic State) कमांडर इब्राहिम अल- हाश्मी अल- कुरेशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) हा ठार झाला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्या दरम्यान (US Air Strike) हाशिमीने स्वत:ला बॉम्बने उडवले होते. या हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सीरियामध्ये ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल- हाशिमी अल- कुरैशी याना (ISIS Leader Abu Ibrahim Al Hashimi Al Qurayshi) ठार मारल्याचा दावा अमेरिकेने गुरुवारी केला होता. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. बायडेन दिलेल्या माहितीनुसार की, काल रात्री माझ्या आदेशानुसार अमेरिकेच्या सैन्याने जगाकरिता मोठा दहशतवादी (Terrorist) धोका असलेल्या इसिसच्या जागतिक नेत्याला ठार केले आहे.

हे देखील पहा-

बायडेन यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, माझ्या सूचनेनुसार काल रात्री अमेरिकन सैन्य दलांनी दहशतवाद विरोधात मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे. सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल धन्यवाद, आम्ही इसिसचा नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी याला ठार करण्यात यश आले आहे. आपल्या जवानांच्या शौर्यामुळे हा कुख्यात दहशतवादी नेता या जगात राहिला नाही. अमेरिकन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मिशनमधील सर्व अमेरिकन सुखरूप परतले आहेत. हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने थेट लाईव्ह बघितले आहे.

अबु इब्राहिम अल-हाशिमी अल-कुराशी, ज्याला अब्दुल्ला करदाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणून ओळखले जाते. हा माजी ISIS प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूवर संघटनेचा नेता बनला होता. अबू बकर अल-बगदादीने देखील २०१९ मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्याने केलेल्या अशाच हल्ल्यात स्वतःला स्फोट घडवून उडवले होते.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सीरियामध्ये अमेरिकेच्या विशेष दलाने केलेल्या हल्ल्यामध्ये इस्लामिक स्टेट गटाचा प्रमुख मारला गेला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात अबू बकर अल-बगदादी मारला गेल्यावर ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतलेल्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT