Pakistan isi planning to blow up railway tracks
Pakistan isi planning to blow up railway tracks Saam Tv
देश विदेश

ना'पाक' डाव! भारतातील रेल्वे रूळ उडवण्याचा ISI चा मोठा कट, गुप्तचर यंत्रणांकडून अ‍ॅलर्ट

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) चा भारताच्या विरोधातील मोठा कट उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या आयएसआयकडून भारतातील पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांतील रेल्वे रूळ स्फोटानं उडवून देण्याचा कट आखण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी (Indian Intelligence Agencies) याबाबत अॅलर्ट जारी केला आहे. आयएसआयच्या हस्तकांनी हा कट आखला आहे. मालगाड्यांची धडक घडवून आणण्यासाठी रेल्वे रूळ उडवून देण्याचा आयएसआयचा कट आहे, असे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे.

हे देखील पाहा

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, गुप्तचर यंत्रणांनी याबाबत अॅलर्ट दिला आहे. भारतातील रेल्वे रूळ उडवून देण्यासाठी आयएसआयकडून (ISI) मोठ्या प्रमाणात हस्तकांना रसद पुरवली जात आहे. पंजाब आणि त्याच्या आसपासच्या राज्यांमध्ये दहशत माजवण्या पाकिस्तानचा (Pakistan) नापाक डाव आहे. या राज्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा कट आखला जात आहे. आयएसआयकडून रेल्वे रूळ उडवून मोठा घातपात करण्याचा कट आखण्यात आला आहे. पाकिस्तानचे स्लीपर सेल भारतात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत, असे सांगण्यात आले. दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी त्यांना पैसा पुरवला जात आहे. बऱ्याच काळापासून पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सीमेपलीकडून मोठ्या संख्येने दहशतवादी भारतात पाठवले जात आहेत, असेही गुप्तचर यंत्रणांकडून (Indian Intelligence Agencies) सांगण्यात येत आहे.

मोहाली हल्ल्याचेही आयएसआयशी कनेक्शन

दरम्यान, अलीकडेच पंजाबच्या मोहालीत पोलीस मुख्यालयावर हल्ला झाला. हा हल्ला मे महिन्याच्या सुरुवातीलाच झाला होता. त्यानंतर देशातील गुप्तचर यंत्रणा अॅलर्टवर आहेत. पोलिसांनी या हल्ला प्रकरणात अनेकांना अटक केली आहे. हल्ल्यामागे बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि आयएसआयचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत, असे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशाऱ्यावर दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि गँगस्टर हे एकत्रित काम करत आहेत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. ९ मे रोजी मोहालीच्या सेक्टर ७७ मधील राज्याच्या पोलीस मुख्यालयावर रॉकेटच्या मदतीने ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. स्फोटामध्ये मुख्यालयाच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नव्हते. या हल्ल्यानंतर या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात येत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT