संतोष शाळीग्राम -
नवी दिल्ली : 'सावरकरांविषयी राजकीय बोला. पण त्यांच्याविषय व्यक्तिगत बोलण्याइतपत आपला स्तर आहे का, याचा विचार राजकीय लोकांनी करावा.' असा टोला भाजपा नेते तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tavade) यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना लगावला आहे. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी सावरकर यांचे टपाल तिकीट जारी केले होते. त्यावेळी त्यांची भूमिका आणि आज काँग्रेसची भूमिका काय, हे आताच्या काँग्रेसवाल्यांना पाहिले पाहीजे. असही तावडे म्हणाले. (Is Nitin Raut's level enough to talk about Savarkar; Question of BJP leaders)
हे देखील पहा -
स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फेसबुकवर अपमानजनक पोस्ट Facebook Post टाकल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असतानाच विनोद तावडे यांनी दिल्लीतून राऊत यांच्यावर टीका केली आहे.
काय होती पोस्ट -
इंदिरा गांधींच्या (Indhira Gandhi) काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तिकीट छापले होते. त्या तिकीटाचा फोटो आणि दुसऱ्या तिकीटावरती असणारा लंगुराच्या तिकीटाची किंमत आणि सावरकरांच्या तिकीटाची किमंती या दोन्हींमधील तफावत दाखवत सावरकरांपेक्षा त्या तिकीटाची किमंत कशी जास्त आहे या आशयाची त्यांनी पोस्ट टाकली होती आणि यावरच त्यांच्या वरती अनेक राजकीय विशेषत: भाजप आणि मनसेने टीका केल्या आहेत.
इंदिराजींनी 'या लंगूराचे' पण, बालपणीच तिकीट काढले होते हे आजच समजले असे राऊतांवरती निशाना साधणारं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
Edited by - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.