IRCTC Saam Tv
देश विदेश

IRCTC चे सर्व्हर ठप्प, तत्काळ बुकिंग सेवा प्रभावीत, सायबर हल्ला तर नाही ना?

(IRCTC Down) भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC वरून तिकीटांचे ऑनलाइन बुकिंग, रद्द करणे, तत्काळ तिकीट बुकिंग सर्व बंद आहेत.

Saam Tv

आयआरसीटीसीची वेबसाइट डाउन असल्याने सोमवारी तिकिटांचे बुकिंग होऊ शकले नाही. रेल्वे प्रवासी चिंतेत दिसले, विशेषत: ज्यांना तत्काळ तिकीट काढायचे आहे त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. बुकिंग विंडो उघडताच IRCTC सर्व्हर डाऊन झाला. दररोज लाखो प्रवासी ऑनलाइन प्रणालीद्वारे तिकीटाचे बुकिंग करतात. सर्व्हर डाऊन असल्याचे याचा आर्थिक फटका प्रवाश्यांसोबतच रेल्वे प्रशासनालाही बसला. 

1 तास तिकीट बुकिंग सेवा बंद

लोक सोशल मीडियावर याबाबत तक्रार करत आहेत, मात्र आतापर्यंत IRCTC कडून या संदर्भात कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. IRCTC वेबसाइटवर लॉग इन केल्यावर डाउनटाइम संदेश येत आहे. देखभालीच्या कामामुळे ई-तिकीटिंग सेवा पुढील 1 तास बंद राहणार असल्याचे संदेशात लिहिले आहे.

तिकीट रद्द करण्यासाठी आणि TDR भरण्यासाठी, लोकांना ईमेल किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करण्यास सांगितले जात आहे. सहसा IRCTC सर्व्हरची देखभाल रात्री केली जाते, परंतु तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 10 वाजता येताच, सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. IRCTC टॅग करून लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

सायबर हल्ला तर नाही झाला?

साइट डाऊन झाल्यावर लोक सायबर हल्ल्याबद्दल बोलत आहेत. कारण 10 वाजल्यापासून देखभाल दुरुस्तीची चर्चा लोकांना पचनी पडत नाही. वास्तविक, AC तत्काळसाठी तिकीट बुकिंग 10 वाजता होते. तर नॉन-एसी बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. आयआरसीटीसी सेवा बंद असल्याने दोन्हीचे बुकिंग शक्य नाही. लोक IRCTC च्या उत्तराची वाट पाहत आहेत. सध्या IRCTC च्या अॅपवर नियोजीत देखभालीचे काम सुरू असल्याचा संदेश खाली देण्यात येत आहे. यामध्ये 10 तारखेला दुपारी 4 वाजेपर्यंत सुविधा सुरळीत होण्याचे सांगण्यात येत आहे. 

Edited By- नितीश गाडगे

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT