IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास

IRCTC च्या संकेतस्थळाशिवाय तुम्ही इतर अ‍ॅप्सवरून रेल्वे तिकीट बूक करू शकतात. या लिस्टमध्ये पेटीएम आणि मेकमाय ट्रीप सारखे पर्याय उपलब्ध आहेत.
IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास
Published On

दररोज रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वे तिकीट बूक करण्यासाठी बहुतेकजण आयआरटीसी वेबसाइटचा वापर करतात. दरम्यान IRCTC व्यक्तिरिक्त असे काही अ‍ॅप्स आहेत ज्यातून रेल्वे तिकीट बूक करता येईल. आम्ही तुम्हाला अशाच काही ॲप्सचा पर्याय देत आहोत, ज्याचा वापर तुम्ही IRCTC वेबसाइटच्या जागी करू शकता. या ॲप्सवर तुम्हाला अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटदेखील मिळतात.

IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास
Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

Paytm

हे एक ऑनलाइन पेमेट करण्यासाठी तयार करण्यात आलेला प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने तुम्ही ट्रेनचं तिकीट बूक करू शकतात. या अ‍ॅप द्वारे तुम्हाला कॅशबॅक सुद्धा मिळू शकते. यासह तिकीट बूक केल्यानंतर सीट मिळणार की नाही याची माहिती ही यातून मिळेल. शिवाय तिकीट बूक केल्यानंतर किती वेळानंतर सीट मिळू शकते याचीही माहिती या अ‍ॅपमधून मिळेल.

IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास
Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Confirmtkt

या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तत्काळ रेल्वे तिकीट बूक करू शकतात. हे अ‍ॅप तुम्हाला कन्फर्मेशन तिकी प्रेडिक्शनसह कन्फर्म तिकीट बूक करण्यास मदत करत असते. वेटिंग लिस्टमधील तिकीट काढल्यास तुम्हाला सीट कधी मिळू शकेल याची माहितीही या अ‍ॅपमधून मिळू शकते.

IRCTC रेल कनेक्ट अॅप

जर तुम्हाला रेल्वेच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करायचे नसेल तर तुम्ही IRCTC Rail Connect ॲप वापरू शकता. हे रेल्वेचे अधिकृत ॲप आहे, जे वेबसाइटप्रमाणेच काम करते. यामध्ये तुम्ही तिकीट बुकिंग तत्काळ तिकीट बुकिंग, कन्फर्मेशन स्टेटस चेक, सीट सिलेक्शन, ट्रेन शेड्यूल आणि पीएनआर स्टेटस इत्यादी ऍक्सेस करू शकता.

MakeMyTrip

ॲप तुम्हाला ट्रिपसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसाठी पर्याय उपलब्ध करून देतो. यात प्रवासाच्या पर्यायासोबतच हॉटेल बुकिंगचाही पर्याय उपलब्ध असतो. तुम्ही या ॲपमध्ये ट्रेन, फ्लाइट, बस आणि हॉटेल बुकिंग सर्वकाही करू शकता. हे ॲप आपल्या वापरकर्त्यांना डिस्काउंटसह अनेक विशेष ऑफर देखील देत असते.

Goibibo

हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्यात ट्रान्सपोर्टेशन पर्यायासह हॉटेल बुकिंगची सुविधा देत असते. या अ‍ॅपमध्ये ट्रेनचं तिकीट बुकिंग करू शकतात. यासह अ‍ॅप ट्रेन शेड्यूल, पीएनआर स्टेटस चेक , आणि कन्फर्मेशन प्रेडिक्शन सारखे पर्याय उपलब्ध करून देत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com