IRCTC Website Technical Issue Saam Tv
देश विदेश

IRCTC Website Technical Issue: IRCTC मधून बुकिंग होत नाही! या ॲप्सवरून मिळणार ट्रेन तिकीट, पहा संपूर्ण यादी

IRCTC News: या ॲप्सवरून मिळणार ट्रेन तिकीट

Shivani Tichkule

IRCTC Website Ticket Booking: ऑनालाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयआरसीटीसीची वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. गेल्या १० तासांपासून ही आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप दोन्ही बंद आहेत. तिकीट बुकिंग दरम्यान पैसे भरल्यानंतरही तिकिटे बुक होत नसल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे. आयआरसीटीसीने काही तांत्रिक समस्या असल्याने तिकिटे बुक होत नसल्यची माहिती आपल्या ट्विटर हँडलवर या समस्येची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

या ट्वीटमध्ये आयआरसीटीसीने (IRCTC) असे सांगितले आहे की, काही तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम बिघाड दुरुस्त करण्याचे काम करत आहे. ही समस्या दूर होताच, आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ.

तुम्ही दुसरा पर्याय वापरून वापरू शकता

मात्र, या काळात तुम्हाला स्वतःसाठी तिकीट बुक करायचे असल्यास तुम्ही इतर ॲप्सचा वापर करू शकता. खुद्द आयआरसीटीसीने याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही तुमची तिकिटे Trainman, Make My Trip वरून बुक करू शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही ॲप्सची माहिती देत ​​आहोत जिथून तुम्ही ट्रेन तिकीट बुक करू शकता.

Make My Trip

तिकीट बुकिंगसाठी ही वेबसाइट खूप लोकप्रिय आहे. येथून तुम्ही केवळ तिकिटेच बुक करू शकत नाही तर हॉटेल, कॅब, ट्रेन, बस आणि फ्लाइट देखील बुक करू शकता. तुमच्या प्रवासाशी संबंधित जवळपास सर्व सुविधा येथे मिळतील. येथून तुम्ही IRCTC च्या तिकीट बुकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता.

Ixigo

ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी ixigo हा एक उत्तम पर्याय आहे. येथून, ट्रेनशी संबंधित सर्व माहितीसह, तुम्हाला तिकीट बुकिंगची सुविधा देखील मिळते.

Trainman

हे अॅप अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाले आहे. येथून तुम्ही ट्रेनमध्ये सीटची उपलब्धता आणि तिकीट बुकिंग दोन्ही करू शकता. एवढेच नाही तर त्यावर पीएनआर स्टेटस आणि कोचची स्थिती तपासणे यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.

PayTM

पेटीएमचा वापर मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन पेमेंटसाठी करतात. तुम्ही येथून रेल्वे तिकीटही बुक करू शकता. तुम्हाला अॅपवरच रेल्वे तिकीट बुकिंगचा वेगळा पर्याय मिळेल. केवळ पेटीएमच नाही तर तुम्हाला Amazon Pay, PhonePe आणि इतर ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर ट्रेन तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT