इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. शांतता चर्चेआधीच मध्य-पूर्वेत तणावात भर पडलीये. होर्मुझवर आपले वर्चस्व राखण्यासाठी इराण आकाश-पाताळ एक करतंय. तर दुसरीकडे अमेरिका सागरी नाकेबंदीच्या माध्यमातून इराणची कोंडी करतंय. दोन्ही देशांतील शस्त्रसंधीची मुदत लवकरच संपणार असून इस्लामाबादमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. मात्र, याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी देत आक्रमक पवित्रा घेतलाय. इतकंच नाही तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही युद्धाच्या आगीत तेल ओतलंय.
नेतन्याहूंचा इराणला इशारा (नेतन्याहू आणि मोजताबा)
इराणविरुद्धची इस्रायलची लष्करी मोहीम अद्याप संपलेली नाही.. ही मोहीम इराणच्या धार्मिक नेतृत्वाला कमकुवत करत आहे.. आम्ही इराणची ताकद मोडून काढलीय
इराणमधील आमचं काम संपलेलं नाही..
खरंतर, इराण-अमेरिका यांच्यात इस्लामाबादेमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होतेय. या चर्चेसाठी अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल होणार आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.कारण जर चर्चा फिस्कटली तर अमेरिका इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर थेट हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर असं काही घडलंच तर संपूर्ण जग पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.