Missile trails light up the sky amid reports of Iran’s retaliatory strikes targeting US military airbases after attacks on Tehran. 
देश विदेश

Iran Vs US: अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर; अमेरिकेचे एअरबेस उद्ध्वस्त

Iran Targeted American Airbases : इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणनेही जोरदार पलटवार करत महासत्ता अमेरिकेला लक्ष्य केलंय.. इराणने कोणत्या देशातील अमेरिकेचे एअरबेस उडवून दिलेत.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Jadhav

  • तेहरानवरील हल्ल्यानंतर इराणचा जोरदार पलटवार.

  • अमेरिकेच्या एअरबेसना लक्ष्य केल्याचा दावा.

  • मध्यपूर्वेत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर विध्वंसक हल्ला केल्यानंतर आता इराणनेही अमेरिकेच्या एअरबेसला लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.इराणने अमेरिका आणि इस्त्रायलला दिलेल्या प्रत्युत्तरात तब्बल 400 क्षेपणास्त्र डागले आहेत. एवढंच नाही तर अमेरिकेला पाठबळ देणाऱ्या युएईचं सर्वाधिक लोकसंख्येच शहर असलेल्या दुबईवरही इराणने जोरदार मिसाईल हल्ले चढवलेत.

अमेरिकेचे तळ असलेल्या देशांमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी युद्धाचा सायरन वाजलाय. मात्र कोणत्या देशांमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहेत..पाहूयात. इराणने इस्त्रायलच नाही तर कतार, कुवैत, बहरीन, जॉर्डन, युएई, सौदी अरेबिया आणि इराकमधील अमेरिकेचे एअरबेस लक्ष्य करुन अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आता इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणला बेचिराख करण्याची धमकी दिल्यानंतर इराणनेही तितकंच चोख प्रत्युत्तर देत महासत्तेला आव्हान दिलंय. तर अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा रशियाने निषेध केलाय. एवढंच नाही तर इराणने आता युएई, कुवैत, कतार, बहरीन, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराकला लक्ष्य केल्यानं हे देशही इराणविरोधात युद्ध छेडण्याची शक्यता आहे.. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा दोन गट पडल्यास जगात तिसरं महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण हादरलं! २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त, वसीम खानसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

Face Care: ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतोय? मग हे ५ सोपे घरगुती उपाय करुन मिळवा क्लिन आणि सॉफ्ट चेहरा

अटकेची भीती दाखवून ७ लाख रुपये उकळले; पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ३ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं

Maharashtra Tourism : सात टेकड्यांच्या कुशीतलं महाराष्ट्रातील निसर्गरम्य शहर, उन्हाळ्यात भरते काश्मीरसारखी हुडहुडी

SCROLL FOR NEXT