Iran Israel War Saam Tv
देश विदेश

Iran Israel War: इराणचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Petrol Price Hike News: इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या युद्धामुळं तेलाच्या किमंतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळं भारतात देखील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Tanmay Tillu

हिजबोल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाहला मारला गेल्यानंतर संतापलेल्या इराणनं इस्रायलवर हल्ला चढवत 200 क्षेपणास्त्रांचा मारा करुन हमास आणि हिजबोल्लाहच्या नेत्यांच्या मृत्यूचा बदला घेतला. इराणनं इस्त्रायलवर केलेला हल्ला स्वसंरक्षणासाठी असल्याचं म्हटलंय.

इस्त्रायलनंही क्षेपणास्त्र हल्ला करुन इराणनं चूक केली असल्याचं प्रत्युत्तरात म्हटलंय.. याआधी एप्रिलमध्ये इराणनं शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीनं इस्रायलवर हल्ला चढवला होता.

इराणचा इस्त्राईलवर हल्ला

इराणकडून इमाद, गदर आणि फतह-2 क्षेपणास्त्राचा वापर करत इस्रायलवर हल्ला केला. क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगाच्या सहा पट होता. गदर क्षेपणास्त्र अवघ्या 12 मिनिटांत इस्राईलला पोहोचतं. फतह - 2 हायपरसॉनिक क्षेपणास्त्र,16 हजार किमी/प्रतितास इतका अतिप्रचंड वेग आहे.

या हल्ल्यामुळे इस्त्राईलचं फार नुकसान झालेलं नाही. मात्र या हल्ल्यांचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यामुळं भारतात देखील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचा भडका

कच्च्या तेलाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. युद्धापूर्वीही 2 टक्के किंमती वाढल्या होत्या. होर्मुझची सामुद्रधुनी दरवाढीसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास कच्च्या तेलाच्या वाहतुकीला फटका बसला. भारत आखाती देशांसह रशियाकडून कच्चं तेल आयात करतो.

देशातील महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्याचं चित्र आहे. मात्र इराण-इस्त्रायलमधील तणाव आणखी वाढल्यास भारतालाही त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT