iran-israel conflict  Saam tv
देश विदेश

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

iran-israel conflict : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली युद्धबंदी मोडीत निघाली असून इराणनं थेट इस्रायलवर भीषण मिसाईल हल्ला चढवलाय...या लष्करी कारवाईमुळे पुन्हा एकदा आखाती युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराणनं इस्ऱायलवर का हल्ला केला? अमेरिकेनं नेमकी काय भूमिका घेतलीय? पाहुयात यावरचाच स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली युद्धबंदी मोडण्याच्या मार्गावर आहे. कारण मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. इस्त्रायलकडून लेबनॉनच्या राजधानी बेरूतवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत. इस्त्रायलनं लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये असलेल्या हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य केल्यानंतर इराणनं थेट इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केलाय. लेबनॉनवरील इस्त्रायली हल्ले थांबवण्यासाठी इराणनं इस्त्रायलवर हवाई हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना फोनही करत पलटवार न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, इस्त्रायलनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला नाकारत इराणवर हल्ले चढवले आहेत.

इस्त्रायलनं इराणच्या 4 शहरांवर हवाई हल्ला केलाय. या कारवाईत तेहरान, इस्फहान, तबरीज आणि मेहराबादमधील 15 पेक्षा जास्त लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलंय. इतकंच नव्हे तर इस्त्रायलनं इराकच्या सुलेमानिया प्रदेशातील इराण-विरोधी कुर्द गटांच्या तळांवरही हवाई हल्ले केलेत.

इराण आणि इस्रायल यांच्यातील हल्ले पुन्हा सुरू झाल्यानं होर्मुझ जलमार्ग बंद होण्याची भीती निर्माण झालीये. तर दुसरीकडे, इराण आणि इस्त्रायलनं एकमेकांवरील हवाई हल्ले तात्काळ थांबवावेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावलंय.

इतकंच नव्हे तर आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्यास इस्त्रायल, अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्याचा इशारा इराणनं दिलाय. तर येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्त्रायलची सागरी नाकेबंदी करण्यासाठी बाब अल मंदेब जलमार्ग बंद करण्याची धमकी दिलीये. त्यामुळे पुढील काळात इराण-इस्त्रायल संघर्षामुळे आखातात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT