Iran’s growing influence in the Middle East raises questions over a shifting balance of power after the Gulf conflict. Saam tv
देश विदेश

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Iran New Leader Muslim World: महासत्ता अमेरिकेच्या इज्जतीची इराणने पुरती धुळधाण उडवली... आणि अमेरिकेला दुबळ्या पाकिस्तानच्या मदतीनं शस्त्रसंधी करण्यास भाग पाडलं.... आता 2 आठवड्यांची शस्त्रंसंधी झाली असली तरी इराणने एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत...

Suprim Maskar

अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने आखाती देशातील अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या मुस्लीम देशांना लक्ष्य केलं... सौदी अरेबिया, इराक, बहरीन, कतार, कुवैत, ओमान, जॉर्डन, तुर्की, सीरियावर हल्ले चढवले... त्यामुळे अमेरिकेच्या इज्जतीची लक्तरं वेशीला टांगले.. महासत्ता असूनही अमेरिका ही या आखाती देशांचं संरक्षण करु शकली नाही... त्यामुळे इराणचा आखाती देशांमध्ये दबदबा वाढलाय..

खरं तर आतापर्यंत मुस्लीम धर्मातील शिया आणि सुन्नी देशांमध्ये संघर्ष होता.. सौदी अरेबिया आणि तुर्की हे आपण सुन्नी मुस्लीम देशाचे खलिफा बनण्यासाठी प्रयत्न करत होते.. तर शिया सुन्नी वादात न पडता मुस्लीम म्हणून एकच आहोत, अशी भूमिका आयातुल्ला अली खामेनींची होती... मात्र सौदी आणि तुर्कीला हा दावा मान्य नव्हता..त्यामुळे इराकसह हे देश इराणविरोधात अमेरिकेच्या वळचणीला गेले होते...आता या देशांचा आका असलेल्या अमेरिकेला कपडे फाटुस्तोवर इराणने झोडपलं...

त्यामुळे भिकेचा कटोरा घेतलेल्या गुलाम पाकिस्तानच्या मदतीनं अमेरिकेनं युद्धबंदी घडवून आणली.. आता ही युद्धबंदी इस्रायल आणि अमेरिका पाळणार की नाही? याबद्दल शंका आहे... मात्र इराणने आखाती देशांवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी फुलप्रुफ योजना बनवलीय...

इराण येमेनमध्ये हुथी बंडखोरांना मदत करतो.. तर गाझा पट्टीत हमास, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, इराकमध्ये शिया मिलिटंट या गटांना शस्त्रं पुरवण्यासोबतच प्रशिक्षणासाठीही मदत करतो... एवढंच नाही इराणच्या 10 अटींवरच अमेरिकेनं युद्धबंदी केलीय.. या अटी काय आहेत? पाहूयात...

होर्मुझवर इराणचं नियंत्रण असावं

अमेरिकेनं आखाती देशांमधील सैन्य कमी करावं

इराणवरील निर्बंध कमी करावेत

इराणच्या युद्धाच्या बदल्यात नुकसान भरपाई

आखाती देशांमध्ये कायमची शांतता नांदण्याची हमी

आता इराणने अस्तित्वाची लढाई बनवून अमेरिकेला गुडघ्यावर आणलं... त्यामुळे आपला आकाच बेईज्जत झाल्यानं तुर्की आणि सौदी अरेबिया इराणपुढे आता दबूनच वागण्याची शक्यता आहे... त्यामुळे 153 देशांच्या इस्लामिक देशांच्या संघटनेचं नेतृत्वंही इराणकडे येण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

महायुतीत 'चेकमेट'चं राजकारण, 2029 साठी आत्तापासूनच शह-काटशह

Maharashtra News Live Update: IT क्षेत्रातील महिलांच्या शोषण प्रकरणी महिला बालकल्याण विभाग लक्ष घालणार

पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात ड्रग्ज, कंडोमचा साठा; प्रशासन झोपलंय का?

SCROLL FOR NEXT