Iran Drone Attack on Israel
Iran Drone Attack on Israel  ANI Twitter
देश विदेश

Iran Israel War: मोठी बातमी! इराणचा इस्रायलवर ड्रोन अटॅक; लेबनानचे एअरस्पेस बंद, जॉर्डनमध्ये आणीबाणी घोषित

Satish Daud-Patil

Iran Drone Attack on Israel

जगात पुन्हा एकदा नव्या युद्धाला सुरुवात झाली असून इराणने इस्रायलवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इराणने शनिवारी (ता १३) इस्रायलच्या दिशेने डझनभर ड्रोन लॉन्च केले आहेत. मात्र, हे ड्रोन इस्रायलला पोहचण्यासाठी काही तास लागतील, असं इस्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर इराणने आपल्या दिशेने १०० हून अधिक ड्रोन डागल्याचा दावाही इस्रायली लष्कराने केला आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने हायअॅलर्ट जारी केला आहे. खबरदारी म्हणून एअरस्पेस बंद करण्यात आले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. आम्ही इराणचे विमान किंवा ड्रोन पाडण्यासाठी सज्ज आहोत, असं इस्रायलने म्हटलं आहे.

यापार्श्वभूमीवर जॉर्डनमध्ये आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच डिफेन्स फोर्स सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे. इराणच्या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायली एअरफोर्सने फायटर जेट आणि नौदलाच्या जहाजांसोबतच एरिअल डिफेन्स एरेलाही हायअलर्टवर ठेवलं आहे.

सध्या इस्रायलचे नौदल आणि हवाई दल डोळ्यात तेल घालून निगराणी करीत आहेत. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी तेल अवीवच्या किरयामध्ये वॉर कॅबिनेडची मिटिंग बोलावली आहे. इराणने इस्रायलवर हल्ला करण्याचे वृत्त धडकताच जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

१ एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासालगतच्या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या दोन मुख्य लष्करी कमांडर्ससह १३ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असा इशारा इराणने इस्रायलला दिला होता. दरम्यान, इराण येत्या दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT