america saam tv
देश विदेश

पाकिस्तानला झटका; होर्मुझमध्ये अमेरिकेनं पाकला दाखवली जागा, नेमकं काय घडलं? video

iran-america : इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थी आता पाकिस्तानला चांगलीच महागात पडलीये. इराणनं होर्मुझमधून पाकिस्तानी जहाजांना परवानगी दिली असली तरी अमेरिकेनं पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिलीये. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

पाकिस्तानात आयोजित केलेल्या इराण-अमेरिका यांच्यातील बोलणी फिस्कटली आणि अमेरिकेनं होर्मुझच्या बाहेर नाकेबंदीची घोषणा केली. त्यानंतर अमेरिकेनं ओमानच्या आखातात तब्बल 10 हजार सैन्य तैनात केलंय. मात्र, नाकेबंदी असतानाही होर्मुझमधून पहिल्याच दिवशी चीनसह अनेक देशांची 20 जहाजं सुरक्षितरित्या बाहेर पडली. मात्र मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचीच जहाजं अमेरिकेनं होर्मुझमधून परत पाठवली. कशी झाली पाकिस्तानची नाचक्की ते पाहूयात...

इराणने पाकिस्तानला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 20 जहाजांच्या वाहतुकीला परवानगी दिली. पाकिस्तानने चार जहाजं होर्मुझमधून बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. मात्र अमेरिकेनं पाकिस्तानला मोठा दणका दिला. अल अरबियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या दोन जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकी सैन्याने त्यांना परत पाठवलं. एकीकडे चीन आणि इतर देशांच्या जहाजांनी त्याच मार्गावरून प्रवास केला. मात्र मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचंच जहाज अमेरिकेनं अडवलं.

होर्मुझमध्ये अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीचा फटका सगळ्या जगाला बसलाय. यातून सूट मिळेल असा पाकिस्तानचा गोड गैरसमज होता..मात्र तो अमेरिकेनं एका झटक्यात दूर केलाय. पाकिस्ताननंही याची कबुली दिलीय.

आता होर्मुझमध्ये अमेरिकेनं दणका दिल्यानंतर पाकिस्तानचा 'मध्यस्थीचा फुगा' फुटलाय. इतकंच नाहीतर अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शांतता चर्चेआधीच अमेरिकेनं पाकिस्तानला तोंडघशी पाडलंय. तर दुसरीकडे, युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील वाढती महागाई आणि कर्ज परतफेड या दुहेरी संकटामुळे पाकिस्तानची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झालीये. त्यामुळे इराण-अमेरिका युद्धात शांतीदूत बनण्यासाठी निघालेलं पाकिस्तानची अवस्था न घर का ना घाट का ...अशी झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT