man hangs himself after wife tells him to die : तो उत्तराप्रदेशमधील, ती राजस्थानची... इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं अन् दोघांनी लग्न केले. प्रेमाच्या आणाभाका खाणारी बायको नवऱ्याला संतापून फाशी घे म्हणाली. मनाला ठेच पोहचलेल्या नवऱ्याने खरेच गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. सहा महिन्यापूर्वीच दोघांनी संसार थाटला होता. पण त्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट झाला. इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा भयंकर शेवट झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये झाली.
मृताचे नाव ध्रुवराज कुशवाह असे आहे. उत्तर प्रदेशमदील ध्रुवराजची ओळख इंस्टाग्रामवरून राजस्थानमधील जयपूरच्या प्रीती नावाच्या मुलीसोबत झाली. दोघांमध्ये संवाद वाढला अन् प्रेमात रूपांतर झाले. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता ध्रुवराज आणि प्रीती यांनी लग्न केले. प्रीतीसोबत लग्न नाही केले तर आत्महत्या करेन, अशी धमकी ध्रुवराज याने कुटुंबाला दिली होती. कुटुंबियांनी मे २०२५ मध्ये दोघांचे मंदिरात लग्न लावून दिले.
लग्नानंतर प्रितीच्या ध्रुवराज याच्याकडून मागण्या वाढतच राहिल्या. आर्थिक कारणांमुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. ध्रुवराज जेमतेम कमवत होता. पण ती महागडे कपडे, खरेदी, प्रवास आणि बाहेर जेवणासाठी सारखा तगदा लावतच होता. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. मृ ध्रुवराज याची बहीण विशाखा कुशवाहा म्हणाली की, प्रीतीने ध्रुवराजवर अधिक पैसे कमविण्यासाठी दबाव आणला होता. पैसे न दिल्यास पुन्हा लग्न करण्याची धमकी दिली होती.
मृतकाच्या कुटुंबियांनी प्रीतीवर गंभीर आरोप केले. दोघांमध्ये जोरात वाद झाला होता. १३ डिसेंबर रोजी प्रितीनी ध्रुवराजचे घर सोडून आई-वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती परत आलीच नाही. सोमवारी फोनवर दोघांचा पुन्हा एकदा जोरात वाद झाला. तू परत आली नाहीस तर आत्महत्या करेन असे ध्रुवराजने बायकोला धमकी दिली. पण यावर प्रितीला काहीच फरक पडला नाही. जा फाशी घे... असे ती ध्रुवराजला म्हणाली. ध्रुवराजला बायकोचे हे म्हणणे मनाला टोलचे. त्यानं गळफास घेत आत्महत्या करत टोकाचा निर्णय घेतला.
वडील रामबाबू, आई आणि दोन बहिणी कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ध्रुवराज त्यांच्यासोबत गेला नाही. त्याने त्यावेळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ध्रुवराज याचे पत्नीसोबत वारंवार भांडण होत होते, त्यामधूनच त्याने टोकाचा निर्णय घेतला. कोतवाली पोलिस ठाण्याने मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.