Indore Fire News
Indore Fire News Saam Tv
देश विदेश

इंदौरमध्ये इमारतीला लागलेली 'ती' आग एकतर्फी प्रेमातून; तरुणाला पोलिसांनी केली अटक

साम वृत्तसंथा

इंदौर: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदौर शहरातील स्वर्णबाग कॉलनीत शनिवारी पहाटे ५ च्या दरम्यान एका दुमजली इमारतीला भीषण आग (fire) लागली होती. या आगीत सात जणांचा मत्यू (Death) झाला. तर ९ जण गंभीर जखमी झाले. आता या घटनेतील धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात होते. पण आता ही आग लावली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Indore Fire News)

स्वर्णबाग कॉलनीतील एका निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेतील आरोपी शुभम दीक्षित उर्फ ​​संजय (२७) याला लोहमंडी परिसरातून अटक करण्यात आली. दीक्षित हा मुळचा उत्तर प्रदेशातील झाशीचा असून काही काळ इंदूरमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून लावल्याचे समोर आले आहे. आरोपी शुभम काही महिन्यापूर्वी याच इमारतीत रहायला होता. यावेळी त्याच एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. शुभमने या तरुणीला लग्नाबद्दल विचारले होते. पण तरुणीने त्याला नकार दिला याचाच राग या तरुणामध्ये होता. याच रागातून या तरुणाने या महिलेची स्कुटर पेटवून दिली होती. ही आग एवढी वाढली की, शेजारी असणाऱ्या सर्व गाड्या जळून आग इमारतीला लागली.

या आगीत एका जोडप्यासह सात जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. पोलिसांनी दीक्षित विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या) आणि 436 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाच्या मुद्द्याव्यतिरिक्त, दीक्षित आणि संबंधित महिलेमध्ये काही दिवसांपूर्वी सुमारे १० हजार रुपयांवरुन वाद झाला होता. आरोपी दीक्षित हा महिलेसोबत पैशाच्या वादातून सहा महिन्यांपूर्वी स्वर्णबाग कॉलनीतील निवासी इमारत सोडून गेला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT