Madhya Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू; वाहनाचा चक्काचूर

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशमध्ये भयंकर कार अपघात झाला. या अपघातामध्ये माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला.

Priya More

Summary -

  • इंदूर बायपासवर भीषण कार अपघात

  • भरधाव कारची उभ्या ट्रकला जोरदार धडक

  • माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

  • एका तरुणीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू

मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री यांची मुलगी, काँग्रेस नेत्याचा मुलगा यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हे सर्वजण प्रवास करत असलेल्या कारने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांच्या मुलांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील तेजाजी नगर बायपासवरील रालामंडलजवळ गुरूवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या कारमधून तीन तरुणी आणि एका तरुण प्रवास करत होते. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची मुलगी प्रेरणा बच्चन, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचे पुत्र प्रखर कासलीवाल आणि मानसिंधू यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का नावाची तरुणी अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रखर कासलीवाल यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीमध्ये हे चौघे सहभागी झाले होते. पार्टीवरून घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी एमवाय रुग्णालयात पाठवले. तर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमी तरुणीची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.

बाला बच्चन हे कमलनाथ सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे बडे नेते आहेत. इंदूरमधील अपघातावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 'काँग्रेसचे आमदार बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन यांच्यासह रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. मी सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जखमी अनुष्का राठी लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात मुंबईहून नागपूरकडे वाहतूक खोळंबली

पुण्यात भरधाव कार पुलावरून कार नाल्यात कोसळली; निर्भीड लष्करी अधिकाऱ्याने चालकाचा जीव वाचवला

राष्ट्रवादीत 'अध्यक्षपदा'चा पेच! सुनेत्रा पवारांच्या विरोधातील 12 आमदार कोण?

बेकायदा बाइक टॅक्सीविरोधात वातावरण तापलं; कॅब आणि रिक्षाचालकांनी पुकारला देशव्यापी बंद

ठाकरेंनी वाढवलं शिंदे फडणवीसांचे टेन्शन, महापौरांची निवडणूक लढणार ठाकरेसेना?

SCROLL FOR NEXT