indonesia accident  Saam tv
देश विदेश

भीषण अपघाताचा थरार! भरधाव बस अचानक उलटली, १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

indonesia accident : भरधाव बस अचानक भींतीला धडकून उलटली. या अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

इंडोनेशियामध्ये भीषण अपघात

बसच्या भीषण अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू

बस रात्री भिंतीला धडकल्याने उलटून घडला भीषण अपघात

इंडोनेशियामध्ये अपघाताची भयंकर घटना घडली आहे. या भीषण अपघातात १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाच्या बुदिओनो भागात सोमवारी रात्री ही भीषण अपघाताची घटना घडली. राजधानी जकार्ता येथून दुसऱ्या शहरात जाणारी ३४ प्रवाशांनी भरलेली बस एका भिंतीला धडकल्याने उलटली. या अपघातात बसमधील १६ प्रवासी दगावले. तर काही जखमी झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा राज्याच्या सेमारंग शहराच्या क्राप्याक टोल एक्झिटजवळील चौकाजवळ हा अपघात घडला. या अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांच्या मदतीला धावले. पोलिसांनी बसमधील मृतदेह ताब्यात घेतले. तर बसमधील १८ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बस वेगात होती. रस्त्यावर बस अचानक डगमगू लागली. त्यानंतर पुढे काही क्षणात ही बस भिंतीला धडकली. अपघातानंतर बसच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तर दरवाजा बंद झाला.

अपघातानंतर प्रवासी बसमध्येच अडकले. त्यांना बसमधून बाहेर पडायला जागाच मिळाली नाही. खिडकीच्या काचा प्रवाशांच्या थेट शरीरात घुसल्या. भीषम अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने आग लागू नये म्हणून तातडीने बसमधील पेट्रोल काढलं. या अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांचे मृतदेह पोस्टमार्टमनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी जकार्तामध्ये एका घराला आग लागल्याने ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. घरात मोठ्या प्रमाणात साहित्य होतं. ते देखील या आगीत जळून खाक झालं. या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर आज १६ प्रवाशांच्या मृत्यूने लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

SCROLL FOR NEXT