Indo-Myanmar Border News : भारत-म्यानमार बॉर्डरवर दोन दिवसांपासून हालचाली वाढल्या आहेत. चांदेलमध्ये भारतीय लष्कराने १० आतंकवादयांना गोळ्या झाडून संपवले आहे. आसाम रायफलने ही कारवाई करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप सुरक्षा दलांनी जाहीर केलेली नाही.
भारतीय लष्कराने मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील न्यू समतल गावाजवळ १० अतिरेक्यांचा खात्मा केला. लष्कराला सशस्त्र दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे आसाम रायफल्सच्या युनिटने बुधवारी ऑपरेशन सुरू केले. हे ऑपरेशन स्पीअर कॉर्प्सच्या अंतर्गत सुरू आहे. लष्कराच्या पूर्व कमांडने X वरून याबाबत माहिती दिली.
ऑपरेशनदरम्यान, संशयित दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. भारतीय लष्कराने अतिरेख्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. सैनिकांनी आपली स्थिती बदलून नियंत्रित आणि संयमित पद्धतीने प्रत्युत्तर दिले. या चकमकीत १० दहशतवादी ठार झाले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
लष्कराने सांगितले की, खेंगजॉय तहसीलमधील न्यू समतल गावाजवळील अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. भारत-म्यानमार सीमेवर दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी अशा कारवाया नियमितपणे केल्या जातात. या भागात दहशतवादी गट सक्रिय असल्याने सुरक्षा दल सतर्क आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईने दहशतवाद्यांचा मोठा डाव उधळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.