Indigo Flight Ruckus /representative Photo SAAM TV
देश विदेश

Indigo Flight Ruckus : आता इंडिगो विमानात दारूड्या प्रवाशांचा धिंगाणा, नेमकंं काय घडलं?

Indigo Flight Shocking Incident : आता इंडिगोच्या विमानात दारूच्या नशेत प्रवाशांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे.

Nandkumar Joshi

Indigo Flight Shocking Incident : एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत प्रवाशानं सहप्रवासी वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार ताजा असतानाच आता इंडिगोच्या विमानात दारूच्या नशेत प्रवाशांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे.

विमानांमध्ये प्रवाशांकडून गोंधळ घालण्याच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत. आता इंडिगो विमानात प्रवाशांनी धिंगाणा घातला आहे. प्रवाशांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीहून पाटण्याला हे इंडिगोचे विमान येत होते. दरम्यान, विमानतळावर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विमानतळावरील एसएचओ रॉबर्ट पीटर यांनी दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशांना अटक केल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार आहे. दोघेही इंडिगोच्या 6E-6383 या विमानातून प्रवास करत होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी प्रवासी हे बिहारचे आहेत. त्यांनी विमानात दारूच्या नशेत धिंगाणा घातला. विमानातील क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. तसेच हवाई सुंदरीचा विनयभंगही केला, असा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी वैमानिकालाही मारहाण केल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री ८.५५ च्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे दोन्ही प्रवासी दिल्ली येथून विमानात बसले होते. दोघेही दारूच्या नशेत होते. रिपोर्टनुसार, दोघेही आरोपी हे बिहारचे रहिवासी आहेत. दिल्लीत ते दारू प्यायले. नशेत धुंद होते. विमानात बसल्यापासून दोघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, या प्रवाशांनी विमानात गोंधळ घातल्याच्या वृत्ताचे खंडन इंडिगोशी संबंधित सूत्रांनी केले आहे.

कंपनी प्रशासनाच्या माहितीनुसार, हे प्रवासी दारू सोबत घेऊन जात होते. तसेच विमानात दारू पित होते. त्यांनी विमानात गोंधळ घातला नाही. विमानातील क्रू मेंबरने त्यांना समज दिल्यानंतर त्यांनी दारू पिणे बंद केले.

विमानतळावर विमान उतरताच क्रू मेंबर्सकडून प्रोटोकॉलनुसार सुरक्षा आणि एटीसी यांना या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असल्याने आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अलीकडेच, गोवा-मुंबई विमानातही क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. दोन विदेशी प्रवाशांनी क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते. दोघांनाही गोव्यातच विमानाने उड्डाण घेण्याआधीच उतरवण्यात आले होते. त्यांना सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या युतीनंतर काल बेफाम नाचले, आज मनसेच्या प्रदेश सरचिटणीसने कमळ घेतलं|VIDEO

Blood Cancer: शरीरावर वारंवार दिसतात ही 2 लक्षणं, असू शकतो जीवघेणा ब्लड कॅन्सर, आताच व्हा सावध, अन्यथा...

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

नाशिकमध्ये सोलापूर पॅटर्न, 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्याच्या भाजप प्रवेशाला विरोध, कारण काय? VIDEO

Sayali Sanjeev: मुंबई पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शाळेत शिकलीये अभिनेत्री सायली संजीव

SCROLL FOR NEXT