सलग चौथ्या दिवशीही इंडिगो कंपनीची ऑपरेशनल समस्या सुरू
विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपट
देशभरातून इंडिगो ची तब्बल ६००हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द
देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोने ९०० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे इंडिगो एअरलाइनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झालीय. मुंबई, दिल्ली, बेंगरुळू विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी प्रवाशांची गर्दी झालीय. प्रवाशांच्या गैरसोयीचा फायदा इतर इतर प्रतिस्पर्धी विमान कंपन्यां घेत आहेत. न इंडिगोमुळे विमानाचा प्रवास रद्द झालेल्या हजारो प्रवाशी आता इतर आकासा एअर, एअर इंडिया आणि स्पाइसजेट सारख्या कंपन्यांचे फ्लाइट प्रवासासाठी बूक करत आहेत. मात्र या कंपन्या अवाच्या सवा दरात तिकीट दर आकारात आहेत.
मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर उड्डाण घेणाऱ्या फ्लाइटच्या दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ झालीय. या मार्गावरील तिकीटाचे जर साधारण ५००० ते ७००० च्या दरम्यान असायचे ते आता तात्काळ प्रवासासाठी १५००० ते २०००० इतका दर आकारला जातोय. मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट ३०-३५ हजारांना मिळत आहे.
जर प्रवाशांना परतीचे तिकीट हवे असेल तर त्यासाठी त्यांना ५९-६० हजार रुपये मोजावे लागत आहेत. इंडिगोच्या गोंधळामुळे अडकलेल्या प्रवाशांना कुठलाही पर्याय नसल्याने हे वाढलेल्या दरातील कितीकट घेऊन प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे 'संकटात संधी' साधण्याचा आणि प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचा क्रूर प्रकार सुरू झाला आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) इंडिगोच्या उड्डाणे रद्द करण्याच्या समस्येवर लक्ष ठेवून आहे. मात्र संकटकाळात इतर कंपन्यांकडून होणाऱ्या या ' दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाहीये. यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. विमान कंपन्यांकडून अशा परिस्थितीत तिकीट दरांची मनमानी केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.