

12 तासांची ड्युटी बंधनकारक असल्याचा दावा खोटा
सोशल मीडियावर व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा
नवीन लेबर कोडमध्ये फ्लेक्सिबल शिफ्ट्सची तरतूद
व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही सत्यता पडताळून सांगतो. तुमची दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून त्याची शहानिशा करून तुमच्यासमोर सत्यता आणतो.आता नव्या कामगार कायद्यानुसार कामगारांना 12 तासांची ड्युटी करावी लागणाराय. असाच एक दावा करण्यात आलाय. आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आता सरकार नव्या कामगार कायद्यानुसार आता 12 तासांची ड्युटी करणार आहे. होय, या व्हिडिओत असाच दावा करण्यात आलाय.पण, खरंच नवीन कामगार कायद्यानुसार आता कामगारांना 12 तासांची ड्युटी करावी लागणार आहे का?
आता कामगारांना 12 तास ड्युटी करावी लागणार आहे असा, दावा केल्याने संभ्रम निर्माण झालाय. कारण, 12 तास काम करायचं म्हटलं तर प्रवासाची वेळ, इतर काम आणि कुटुंबाला वेळ कधी देणार हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल. आणि 8 तास काम करताना माणूस थकून जातो, मग रोज 12 तास काम करणं शक्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.
त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली.या नवीन कामगार कायद्यात नक्की काय म्हटलंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तसंच सरकारने याबाबत काय माहिती दिलीय का? हेदेखील जाणून घेतलं. त्यावेळी सरकारनेच आपल्या अधिकृत वेबसाईट पीआयबीवरून ही माहिती दिलीय. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू केलाय
सामान्य कामाचे तास दररोज 8 ते 12 तास
आठवड्याला 48 तास निश्चित करण्यात आले
अधिक तास काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल
दुप्पट ओव्हरटाईम पगार कामगाराला द्यावा लागेल
विशेष म्हणजे कामगारांच्या संमतीनेच ओव्हरटाईमला परवानगी असेल. सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कामाच्या वेळेपेक्षा कमीत कमी दुप्पट ओव्हरटाइम वेतन द्यावे लागेल. मात्र, आता केंद्र सरकारने कामगारांची ड्युटी 12 तास केल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.