DGCA ने घेतला युटर्न, क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय घेतला मागे; इंडिगो एअरलाइन्सचे टेन्शन होणार दूर

DGCA New Decision: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे एअरलाइन्स कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळानंतर हा निर्णय घेण्यात आला.
DGCA ने घेतला युटर्न, क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय घेतला मागे; इंडिगो एअरलाइन्सचे टेन्शन होणार दूर
DGCA New Decision saam tv
Published On

Summary -

  • DGCA ने क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टीबाबतचा निर्णय तात्काळ मागे घेतला

  • इंडिगोच्या शेकडो उड्डाणे रद्द झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला

  • DGCA च्या निर्णयामुळे एअरलाइन्स कंपन्यांना मिळाला दिलासा

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डीजीसीएने क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. डीजीसीएच्या या निर्णयामुळे आता देशभरातील विमानसेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे. क्रू-मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्ट्यांबाबतच्या निर्णयानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानसेवा विलंबाने सुरू होत्या. तसंच ५५० पेक्षा अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सचा गोंधळ सुरू आहे. इंडिगो एअरलाइन्सची विमान उड्डाणे रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशभरातील विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांच्या तिकिटाचे पैसे वाया गेले. विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना परत घरी जावे लागले. या सर्व घडामोडींनंतर डीजीसीएने मोठा निर्णय घेत सर्व एअरलाइन्सला दिलासा दिला.

DGCA ने घेतला युटर्न, क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय घेतला मागे; इंडिगो एअरलाइन्सचे टेन्शन होणार दूर
IndiGo Flight: हैदराबादला निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड, ४० मिनिटं आकाशात घातल्या घिरट्या नंतर...; प्रवाशांचा जीव टांगणीला

डीजीसीएने आपला रोस्टर ऑर्डर मागे घेतला. राम मोहन नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांना इंडिगो एअरलाइन्सच्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला आहे. विमान उड्डाणांमध्ये सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले आहे.

DGCA ने घेतला युटर्न, क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय घेतला मागे; इंडिगो एअरलाइन्सचे टेन्शन होणार दूर
Indigo Airlines: २४ तासांत ५५० हून अधिक उड्डाणे रद्द, इंडिगोच्या प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

डीजीसीएने एक परिपत्रक जारी करून निर्णय मागे घेतल्याबाबत माहिती दिली. यामध्ये डीजीसीएने सांगितले की, 'अनेक उड्डाणांच्या ऑपरेशनमध्ये सुरू असलेल्या व्यत्ययामुळे आणि विमान कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता 'साप्ताहिक सुट्टी'चा निर्णय तात्काळ मागे घेण्यात आला आहे.' डीजीसीएने क्रू मेंबर्सना साप्ताहिक सुट्टीऐवजी रजा वापरण्यास प्रतिबंध करणारा नियम मागे घेतल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. हा नियम तात्काळ लागू झाला आहे.

DGCA ने घेतला युटर्न, क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय घेतला मागे; इंडिगो एअरलाइन्सचे टेन्शन होणार दूर
Amol Kolhe : "यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..."; IndiGo एअरलाइनचा सावळा गोंधळ पाहून अमोल कोल्हे संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com