Indio Airline  Saam Digital
देश विदेश

Indigo Airline : इंडिगो-एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांची एकमेकांना धडक, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

Sandeep Gawade

Indio Airline

कोलकाता विमानतळावर बुधवारी मोठा विमान अपघात टळला. धावपट्टीवरून जात असताना इंडिगोचे विमान पार्क केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला धडकले. एअर इंडिया एक्स्प्रेसचे हे विमान कोलकाताहून चेन्नईला जाण्याच्या तयारीत होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. त्याचवेळी, हवाई वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारवाई करत इंडिगो पायलटना रोस्टरमधून काढून टाकलं आहे. डीजीसीएने याप्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

बुधवारी सकाळी कोलकाता विमानतळावर हा अपघात झाला. त्यावेळी इंडिगो विमान टॅक्सी मार्गावरून धावपट्टीवरून जात होते. यादरम्यान विमानाचा काही भाग धावपट्टीवर उड्डाणाच्या तयारीत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धडकला. DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगो A320 VT-ISS विमानाने एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 737 VT-TGG ला धडक दिली. दरम्यान इंडिगोच्या दोन्ही पायलटवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एअर इंडिया एक्स्प्रेसचं स्पष्टीकरण

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने एएनआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विमान चेन्नई, तामिळनाडूला जाण्यासाठी कोलकाता विमानतळाच्या रनवेवर क्लिअरन्सची वाट पाहत होते. यादरम्यान इंडिगो एअरलाइनच्या विमानाच्या पंखाचा एक भाग एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला धडकला. अपघातानंतर विमान परत करण्यात आले. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT