Punch CAMO Tata Motors Saam Tv
देश विदेश

Tata Motors : भारतातील सर्वात सुरक्षित कार माहितेय का? टाटा मोटर्सने लाँच केली 'ही' एडिशन

सणासुदीच्या हंगामाची सुरुवात जोरदार करत, ही एडिशन ग्राहकांना आकर्षक रंगसंगती व असंख्य सुविधा देणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतातील आघाडीची ऑटोमोटिव कंपनी (Company) आणि पहिल्या क्रमांकाचा एसयूव्ही ब्रॅण्ड (विक्रीच्या निकषावर) असलेल्या टाटा मोटर्सने आज टाटा पंच या आपल्या नवीन व चैतन्यपूर्ण ब्रॅण्डची कॅमो एडिशन बाजारात आणली. सणासुदीच्या हंगामाची सुरुवात जोरदार करत, ही एडिशन ग्राहकांना आकर्षक रंगसंगती व असंख्य सुविधा देणार आहे. ही साहसी (अॅडव्हेंचर) व परिपूर्ण (अकम्प्लिश्ड) व्यक्तिमत्वाच्या ग्राहकांसाठी ऱ्हिदम व डॅझलसह उपलब्ध असेल. टाटा पंच कॅमो ६.८५ लाख (एक्स-शोरूम नवी दिल्ली) एवढ्या आकर्षक किंमतीत खरेदी करता येईल आणि आजपासून ही गाडी टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत डीलरशिप्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

टाटा पंच कॅमो एडिशन पूर्णपणे नवीन अशा, बाहेरील बाजूने मोहक फॉलिएज ग्रीन रंगात येणार आहे, तर छतासाठी ड्युअल टोन रंगांचा पर्यायात मिळणार आहे. या नवीन मॉडेलसह (Model) पंच आता नऊ ताज्यातवान्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध झाली आहे. कॅमो एडिशनचा आतील भाग अनोख्या मिलिट्री ग्रीन रंगात आहे आणि आसनांची अपहोल्स्ट्री कॅमोफ्लॉज्ड प्रकारची आहे. कारच्या फेण्डर्सवर आकर्षक कॅमो बॅजिंग आहे आणि ती एमटी व एएमटी या दोन्ही ट्रान्समिशन प्रकारांत उपलब्ध होईल.

यात काय मिळेल ?

- यात अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्लेसह आणि ६ स्पीकर्ससह ७ इंची हरमान इन्फोटेनमेंट प्रणाली, १६ इंची चारकोल डायमंड कट मिश्रधातूंची चाके व रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे.

- कॅमो एडिशनमधील आणखी काही रोचक अतिरिक्त सुविधांमध्ये एलईडी डीआरएल व टेल लॅम्प्स, पुश स्टार्ट/स्टॉप बटन, क्रुझ कंट्रोल व फ्रण्ट फॉग लॅम्प्सचा समावेश होतो.

Punch CAMO Tata Motors

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडच्या विक्री, मार्केटिंग व ग्राहकसेवा विभागाचे उपाध्यक्ष श्री. राजन अम्‍बा यावेळी म्हणाले, “आमचा पोर्टफोलिओ कायम नवीन (न्यू फॉरएव्हर) राखण्याच्या ब्रॅण्डच्या वचनाशी सुसंगती राखत, पंच लाइन-अपमध्ये कॅमो एडिशन बाजारात आणताना आम्हाला आनंद होत आहे. या नवीन कारमुळे टाटा पंचच्या विक्रीमध्ये आणखी वाढ होणार आहे आणि वाढीचा वेग पुढे जाणार आहे. अफलातून डिझाइन, वैविध्यपूर्ण व आकर्षक कामगिरी, प्रशस्त अंतर्गत रचना व संपूर्ण सुरक्षिततेसाठी प्रशंसा प्राप्त केलेली पंच आमच्या उत्पादन पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग आहे आणि आमच्या एकूण प्रवासी वाहन (पीव्ही) विक्रीमध्ये तिचे योगदान २४ टक्के आहे.

देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सच्या यादीत पंचचा सातत्याने समावेश होत आला आहे आणि अत्यंत स्पर्धात्मक अशा आटोपशीर (कॉम्पॅक्ट) एसयूव्ही विभागात बाजारपेठेतील १५ टक्के वाटा या कारकडे आहे. सणासुदीचा आनंद आणखी वाढवत आणि बाजारपेठेतील क्रमांक १चे एसयूव्ही उत्पादक म्हणून मिळालेल्या क्रमवारीमुळे वाढलेल्या उत्साहाचा लाभ घेत बाजारात आणलेली कॅमो एडिशनही आपल्या नवीन स्वरूपाच्या जोरावर ग्राहकांच्या मानसिकतेचा ताबा घेण्यात व बाजारातील खरेदीची भावना वाढवण्यात उपयुक्त ठरेल.”

२०२१ मध्ये बाजारात आल्यापासून टाटा पंच ही वैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या तरीही आपल्या जाणिवेशी (व्हाइब) चिकटून राहणाऱ्या स्वरूपासाठी ओळखली जाते. १.२ लिटर पेट्रोल इंजिनचे पाठबळ असलेली पंच ही भारतातील सर्वांत सुरक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून तिला फाइव्ह-स्टार जीएनसीएपी रेटिंग आहे. हॅशचे चापल्य आणि एसयूव्हीचा डीएनए अशा संयोगातून तयार झालेली ही गाडी विविध दरबिंदूंवर विस्तृत पर्याय आणि ग्राहकांच्या व्यापक वर्गाच्या गरजांची पूर्तता करते. टाटा मोटर्सच्या पीव्ही परिवारातील हा सर्वांत नवीन सदस्य असून, त्याने भारतीय कार ग्राहकांमध्ये आपले स्थान प्रस्थापित केले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये या गाडीच्या १२,००६ युनिट्सची विक्री झाली आणि पंचने आतापर्यंतची सर्वोच्च विक्री नोंदवली. त्याचबरोबर केवळ १० महिन्यात १ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडून (#FastestFirst100K) पंचने आपल्या वाढत्या मागणीची कल्पना सर्वांना दिली.

या शोरूममध्ये मिळेल‌ -

Models Manual Price (in INR, ex-showroom, New Delhi) Automatic Price (in INR, ex-showroom, New Delhi)

Punch CAMO Adventure 6.85 Lakhs 7.45 Lakhs

Punch CAMO Adventure Rhythm 7.20 Lakhs 7.80 Lakhs

Punch CAMO Accomplished 7.65 Lakhs 8.25 Lakhs

Punch CAMO Accomplished Dazzle 8.03 Lakhs 8.63 Lakhs

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT