Sleeper Vande Bharat train Saam tv
देश विदेश

Sleeper Vande Bharat : मुंबईतून धावणार स्लीपर वंदे भारत; विमानासारखा वेग, १६०० किमी अंतर अवघ्या १२ तासांत

Sleeper Vande Bharat train : मुंबई-लखनौ मार्गावरून पहिली स्लीपर वंदे भारत धावणार आहे. ही वंदे भारत ट्रेन १६०० किमी अंतर अवघ्या १२ तासांत पूर्ण करणार आहे.

Vishal Gangurde

पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन लखनौ ते मुंबई मार्गावर सुरू होणार

ट्रेन १६०० किमी अंतर केवळ १२ तासांत पार करणार

सध्या लागणारा वेळ १९ तासांपेक्षा अधिक

ही ट्रेन आग्रामार्गे धावणार, यामध्ये २० स्लीपर कोच असणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

Vande Bharat Express Lucknow Mumbai: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर हाती आली आहे. देशातील पहिली एसी स्लीपर वंदे भारत उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ ते मुंबई या मार्गावर धावणार आहे. या स्लीपर वंदे भारत रेल्वे संपूर्ण तयारी झाल्याची माहिती मिळत आहे.

आग्रा विभागाच्या पारड्यात पाचवी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. पाचवी वंदे भारत ही लखनौ ते मुंबई अशी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्लीपर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आता फक्त रेल्वे विभागाच्या परवानगीची गरज आहे. ही ट्रेन आग्रामार्गे मुंबई ते लखनौदरम्यान धावणार आहे.

स्लीप वंदे भारत ट्रेन ही लखनौहून मुंबईला पोहोचायला १२ तास लागणार आहेत. तर साधारण या मार्गावर प्रवासासाठी १९ तासांहून अधिक वेळ लागतो. या स्लीपर वंदे भारत ट्रेनला २० कोच असणार आहेत.

लखनौ-मुंबई स्लीपर वंदे भारत ट्रेन ही आग्रा मार्गाहून जाणार आहे. आग्रा येथून मुंबई किंवा लखनौला जाणे सोपे होणार आहे. आतापर्यंत या मार्गावर कोणतीही वंदे भारत ट्रेन धाव नव्हती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सूरतहून मुंबईपर्यंत जपानमधील मंत्र्यांसोबत वंदे भारतने प्रवास केला. त्यामुळे लवकरच दुसऱ्या मार्गावरही नवी वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

एका वर्षाआधी आग्रा विभागाला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली. यानंतर उदयपूर, खजुराहो आणि वाराणसी वंदे भारत ट्रेन सुरु झाली. या ट्रेनचा वेग १६० किमी प्रति तास इतका आहे. या लेखातील माहिती अधिकृत रेल्वे विभागाकडून मिळाली नाही. तर वृत्त संस्थावरील उपलब्ध माहितीच्या आधारे लेख लिहिण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Karjat Tourism : कर्जतमध्ये लपलाय पांढरा शुभ्र धबधबा, पाहा नेमकं कसं जायचं?

Amruta Khanvilkar: उफ्फ क्या हे लूक है.... अमृताचा कातिल अंदाज, सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले

Tuesday Horoscope: पैसा, प्रेम सारं मिळणार, तुमच्या नशिबी काय? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT