प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतामध्ये आलेली सीमा हैदर (Seema Haidar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अशामध्ये आता प्रियकरासाठी पाकिस्तान गाठलेली अंजू देखील चर्चेत आहे. पाकिस्तानात गेलेल्या अंजूबाबत (Anju In Pakistan) मोठी बातमी समोर येत आहे. अंजूने आपल्या पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाहशी निकाह केला असल्याचे सांगितले जात आहे. तसंच अंजूने आपला ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. ऐवढंच नाही तर तिने आपले नाव बदलून इस्लाम धर्मानुसार फातिमा नाव ठेवले आहे.
मंगळवारी अंजू आणि तिचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह (Anju Nasrullah's Love Story) यांच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. दीर वरच्या जिल्हा न्यायालयात अंजू आणि नसरुल्ला यांनी निकाह केला असल्याचे सांगितले जात आहे. निकाह झाल्यानंतर अंजूने सांगितले की, 'मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी पुन्हा इथे येईल.'
अंजूचा उत्तर प्रदेशातील कैलोर गावात जन्म झाला. अंजूचे लग्न झालेले असून तिला दोन मुलं देखील आहेत. अंजूला 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर ती राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहात होती. नसरुल्ला आणि अंजू यांची 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती.
कालच नसरुल्लाहने अंजूशी प्रेमसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. तसंच लग्न करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले होते. तर अंजू 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यानंतर घरी परत येणार असल्याचे सांगितले जात आहे.
असे असताना आता अंजू आणि नसरुल्ला यांच्या निकाहची बातमी समोर आली आहे. दोघांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर दीर या आदिवासी जिल्ह्यात नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली आहे. अंजू ३४ वर्षांची असून तिचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्ला २९ वर्षांच्या आहे.
पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात अंजूने प्रवास केला आहे. भारतातून पाकिस्तानात पोहचल्यावर सुरुवातीला पोलिसांनी अंजूला ताब्यात घेतलं होतं. नंतर आपल्याजवळ असलेली सर्व कागदपत्रे तिने पोलिसांना दाखवली. प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर अंजूला सोडण्यात आलं होतं.
दरम्यान, अंजूचा पती अरविंद हा राजस्थानमध्ये राहतो. अंजू लवकरच परत येईल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. अरविंदने सांगितले होते की, त्याची पत्नी गुरुवारी जयपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र ती परत आली नाही. त्यानंतर ती पाकिस्तानात पोहोचल्याचे माहिती कुटुंबीयांना मिळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.