Beed Saam
देश विदेश

Beed Case: संतोष देशमुखांच्या हत्येचा तीव्र निषेध साता समुद्रापार, होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला

Indian woman protest UK Beed Case: देशमुखांच्या हत्येचा निषेध सातासमुद्रापार. थेट इंग्लंडमध्ये एका भारतीय महिलेनं देशमुख प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळत होळी केली आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची आग अजूनही राज्यात धगधगत आहे. या घटनेला ३ महिने उलटले, मात्र अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. या घटनेचा निषेध तसेच मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी राज्यातील कानाकोपर्‍यातून होत आहे.

फक्त बीड किंवा राज्य नाही तर, देशमुखांच्या हत्येचा निषेध सातासमुद्रापारमधून केला जात आहे. थेट इंग्लंडमध्ये एका भारतीय महिलेनं देशमुख प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळत होळी केली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महिलेने यासंदर्भात सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिनं म्हटलं की, 'मी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या नराधमांचा निषेध व्यक्त करत त्यांची होळी करत आहे. नराधमांनी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली. या हत्याकांडाचे फोटो समोर आले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो', अशा शब्दात भारतीय महिलेनं या घटनेचा निषेध व्यक्त केला.

तसेच सरकारकडे नराधमांना कठोरकठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. महिलेसोबत तिच्यासोबत असणाऱ्या चिमुकलीनं देखील निषेध व्यक्त केला आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडीनं सादर केलेल्या दोषारोपत्रातून अनेक बाबी समोर येत आहेत. मारहाणीचे फोटो आणि हत्याराचे फोटो पाहून अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली. या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

SCROLL FOR NEXT