Russia- Ukraine War: यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण...(पहा Video) Saam Tv
देश विदेश

Russia- Ukraine War: यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण...(पहा Video)

रशिया- यूक्रेन यांच्यामधील युद्धाला ५ दिवस उलटले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: रशिया- यूक्रेन यांच्यामधील युद्धाला ५ दिवस उलटले आहेत. आज देखील यूक्रेनच्या (Ukraine) अनेक शहरामध्ये स्फोटांचे (explosions) आवाज कानी पडत आहेत. यूक्रेनचे सैन्य बलाढ्य रशियाच्या (Russia) समोर झुकण्यास तयार नाही. यूक्रेनची राजधानी (Capital) कीव ताब्यात घेण्याकरिता रशिया आक्रमक हल्ला (Attack) करायला सुरवात केले आहे. मात्र यूक्रेनचे सैन्य देखील देशाचे संरक्षण करण्याकरिता जीवाची बाजी लावत आहेत. त्यामध्ये आता सर्वसामान्य नागरिक देखील युद्धामध्ये उतरले आहे. (Indian students beaten in Ukraine)

यूक्रेनच्या अशा वातावरणामध्ये अडकलेल्या हजारो भारतीय (Indian) विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढत आहे. आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे. परंतु, अजून देखील बरेच विद्यार्थी याठिकाणी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी भारत सरकारकडे (Government of India) लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्याची मागणी केली आहे.

पहा व्हिडिओ-

राहुल गांधींनी ट्विट करुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर हिंसाचार आणि मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत सांगितले आहे की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ, फोटो येत आहेत ते बघून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकतो. असे व्हिडीओ बघून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असणार आहेत. कोणत्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये.

हे देखील पहा-

भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. याअगोदर राहुल गांधींनी कर्नाटक मधील काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. ते विद्यार्थी यूक्रेनमध्ये बंकरमध्ये अडकले होते. बंकर मधील स्थिती विदारक होती. ज्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. त्या पूर्व यूक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत.

या विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी आणले पाहिजे असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले होते. परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेन मधील भारतीयांना मायदेशी आणण्याकरिता ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. त्याकरिता हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. आज सकाळी एअर इंडियाचे विमान ६.३० वाजेच्या सुमारास रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून दिल्लीला पोहचले आहे. त्यामध्ये २४९ विद्यार्थी होते. मागील ३ दिवसांपासून आतापर्यत ही ५ वी फ्लाईट आहे.

३ दिवसामध्ये आतापर्यंत १ हजार १५६ भारतीयांना यूक्रेनमधून परत आणले आहे. रशियाच्या हल्ल्यावर यूक्रेन मधील स्थिती बिघडत जात आहे. भारताबरोबरच अनेक देशामधील नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परिने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करत आहेत. गेल्या २ दिवसांपासून यूक्रेनची राजधानी कीववर रशिया हल्ला करत आहे. रशिया- यूक्रेन मधील युद्ध रोखण्याकरिता जगभरातून प्रयत्न होत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Symbol: मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती द्या; पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतच मुंबईकरांना शब्द; लाडकी बहीण, धनुष्यबाण चिन्ह, टोलमाफीवरही सर्व काही बोलले!

Relationship Tips: ब्रेकअप का होतो? ही आहेत प्रमुख कारणे

Muktainagar News : अपक्ष उमेदवारावर गोळीबार करणारा एकजण ताब्यात; दोघे अजूनही फरार

Sadabhau Khot : महाराष्ट्र बदलायचं म्हणजे...; शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली,VIDEO

SCROLL FOR NEXT