सुशांत सावंत
मुंबई: सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आले आहे. आज वर्षा बंगल्यावर सकाळी ११ वाजता चर्चा होणार आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सांगितले आहे. आंदोलन (Movement) कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असे देखील खासदार संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना असताना सांगितले की, आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झाले आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले आहेत.
हे देखील पहा-
खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी बघितली आहे. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या कमीत- कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असे काही नाही, असे ते म्हणाले. याअगोदर देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळे नाही आहे. मला त्रास होत आहे, सरकारने (government) ठरवावे आता कुठपर्यंत न्यायचे आहे. सरकारकडून बोलवणं आले आहे, असे ते म्हणाले आहेत.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळाबरोबर मराठा आरक्षण (Maratha reservation) उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षेखाली ११ वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. संभाजीराजे म्हणाले की, यामधून मार्ग निघाला पाहिजे. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण इथे आहोत. मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचे नेतृत्व करत आहे. आपण मार्ग काढून यावं अशी माझी विनंती आहे, असे यावेळी ते म्हणाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.