Pahalgam Terror Attack X
देश विदेश

Indian Army : भारतीय सैनिकांची मोठी कारवाई, कुलगाममध्ये २ दहशतवाद्यांना बेड्या, बंदुका अन् जिवंत काडतुसेही जप्त

Pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्याशी संबंधित दोघा दहशतवादी सहाय्यकांना कुलगाममधून अटक, लष्कराच्या TRF संघटनेने घेतली होती जबाबदारी, सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई.

Namdeo Kumbhar

Indian Army action : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील 28 देशवासियांच्या मृत्यूनंतर लष्कराने मिशन बदला सुरु केला. भारतीय सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आज मोठी कारवाई केली आहे. कुलगाम जिल्ह्यातील कैमोह परिसरातील थोकरपोरा गावातून दोन दहशतवादी सहाय्यकांना अटक करण्यात आली. हे दोघेही दहशतवाद्यांना मदत करत होते, असे समोर आले आहे. त्या दोघांकडून हत्यारेही जप्त केली आहेत. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात संताप आणि शोकाची लाट पसरली होती. कुलगाम येथून अटक केलेल्या संशयितांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पहलगाममधील बैसरण खोऱ्यातील दहशतवादी हल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्यात दोन विदेशी नागरिकांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये नौदलाचा अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही समावेश होता. हल्लेखोरांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांकडून काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कुलगाममधील अटकेनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. पोलिस सूत्रांनुसार, अटक केलेले संशयित दहशतवाद्यांना लॉजिस्टिक आणि माहिती पुरवत होते. यापूर्वीच अनंतनाग पोलिसांनी हल्ल्यातील तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांवर २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या अटकेमुळे हल्ल्यामागील कटाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT