Vande Bharat Train News: Irctc'S Response Over Dead Cockroach Found In Vande Bharat Meal Photo Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Train Food: 'वंदे भारत ट्रेन'मधील जेवणात सापडलं झुरळ; प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTC ने दिलं हे उत्तर

प्रविण वाकचौरे

Vande Bharat Train News :

वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मार्फत रेल्वे प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या पॅकबंद जेवणात हे झुरळ आढळलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने राणी कमलापती ते जबलपूरला जाणाऱ्या एका प्रवाशाला हा विचित्र अनुभव आला आहे.

या प्रवाशाने जबलपूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पश्चिम मध्य रेल्वेकडे अधिकृत तक्रार नोंदवली. दोन दिवसांनंतर त्या प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेची माहिती दिली. या प्रवाशाने आपल्या पॅकबंद अन्नाचे फोटो शेअर केले. प्रवाशाने आयआरसीटीसी, रेल्वे मंत्री आणि अगदी पंतप्रधानांनाही टॅग केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या फोटोमध्ये प्रवाशाने ऑर्डर केलेल्या जेवणात मेलेलं झुरळ असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय प्रवाशाने तक्रार केलेला फॉर्म देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्व घटना लिहिली आहे. (Latest News)

प्रवाने ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

प्रवाशाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, मी 1 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेन क्रमांक 20173 राणी कमलापती ते जबलपूर असा प्रवास करत होतो. मला दिलेल्या फूड पॅकेटमध्ये मेलेले झुरळ पाहून मला धक्काच बसला.

IRCTC चा रिप्लाय

आयआरसीटीसीने देखील या पोस्टला तत्काळ रिप्लाय केला आहे. आयआरसीटीसीने लिहिले की. या अनुभवाबद्दल आम्ही खूप दिलगीर आहोत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून संबंधितांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT