Railway Ticket Clerk Saam Tv
देश विदेश

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

Karnataka News : कर्नाटकातील रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीवरील कर्मचारी फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.

Alisha Khedekar

  • ड्युटीवर असताना प्रवाशांकडे दुर्लक्ष करून रेल्वे कर्मचारी फोनवर बोलताना आढळला.

  • व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

  • प्रवाशांच्या तक्रारींनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली.

  • जागरूक नागरिकामुळे ही बाब उघड झाली असून, सोशल मीडियाची ताकद पुन्हा सिद्ध झाली.

कर्नाटकातील एका रेल्वे स्थानकावर घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. तिकीट खिडकीवर तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, तो ड्युटीच्या वेळेत प्रवाशांच्या लांबच लांब रांगेकडे दुर्लक्ष करून निवांतपणे फोनवर बोलत असल्याच स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रेल्वे प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई केली आहे.

सदर व्हिडिओमध्ये दिसते की, तिकीट खिडकीवर बसलेला सी महेश नावाचा कर्मचारी फोनवर अगदी निवांतपणे संभाषण करत होता, तर दुसरीकडे तिकीट मिळवण्यासाठी प्रवासी दीर्घकाळ रांगेत उभे होते. काही प्रवाशांनी वेळोवेळी विनंती करूनही त्याने त्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले. एका प्रवाशाने थेट त्याच्याशी संवाद साधत ‘फक्त एक मिनिट थांबा’ हे उत्तर सतत देत असल्याचा उल्लेख केला. मात्र, हा 'एक मिनिट' तब्बल १५ मिनिटांपर्यंत लांबले.

प्रवाशांच्या या नाराजीला उत्तर देताना, संबंधित कर्मचारी कोणताही खेद व्यक्त करत नसल्याचेही दिसून आले. उलट, त्याने शांतपणे लोकांना थांबण्यास सांगितले आणि संभाषण चालू ठेवले. अखेर, वातावरणात वाढती अस्वस्थता लक्षात घेत त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिकीट वाटप सुरू केलं.

या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली असून, नागरिकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. काहींनी हे वर्तन "लज्जास्पद" असे म्हटले तर काहींनी यासारख्या घटनांवर लगाम घालण्यासाठी नियमित तपासणी आणि अधिक कडक शिस्तीची मागणी केली. काही वापरकर्त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण मान्य केला असला, तरीही अशा प्राथमिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने त्वरित पावले उचलली आहेत. गुंटकल रेल्वे विभागाने सांगितले की, सी महेश या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. एक जागरूक प्रवासी स्टेशन मॅनेजरला व्हिडिओ पाठवल्यानंतरच संबंधित विभागाने ही कारवाई केली. स्टेशन मॅनेजर भागीरथ मीना यांनीही या निलंबनाची अधिकृत पुष्टी केली असून, कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही घटना उदाहरण ठरली आहे की, सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेला न जुमानता शासकीय जबाबदाऱ्यांची उघडपणे पायमल्ली झाल्यास त्याचा परिणाम काय होऊ शकतो. प्रवाशांनी दाखवलेल्या जागरुकतेमुळे एक गैरजबाबदार कर्मचारी आता निलंबित करण्यात आला आहे.

हा प्रकार नेमका कुठे घडला?

कर्नाटकातील एका रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला आहे.

कर्मचारी कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत आला?

ड्युटी दरम्यान प्रवाशांकडे दुर्लक्ष करून तो फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने काय कारवाई केली?

संबंधित सी महेश नावाच्या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

ही कारवाई कशी शक्य झाली?

एका जागरूक प्रवाशाने व्हिडिओ स्टेशन मॅनेजरला पाठवला, त्यानंतर प्रशासनाने कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT