Indian Railway Saam TV
देश विदेश

India Railway: भारतातील एकमेव ट्रेन ज्यात फुकटात प्रवास करता येतो; कुठे धावते ही ट्रेन? तिकीट का नसतं? जाणून घ्या सर्वकाही

भाक्रा-नागल धरणाला भेट देणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन चालवली जाते.

प्रविण वाकचौरे

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. देशात रॉयल ट्रेन ते पॅसेंजर ट्रेन अशा अनेक प्रकारच्या गाड्या धावतात. सुविधांनुसार या गाड्यांचे भाडे आकारले जाते. मात्र रेल्वेने तुम्ही विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास त्यासाठी दंडाची देखील तरतूद आहे.

मात्र देशात अशी एक ट्रेन आहे ज्यात प्रवाशी फुकटात प्रवास करु शकतात. त्यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही. ट्रेन कुठून कुठे धावते आणि त्यात भाडे का नाही? याबद्दल जाणून घेऊयात.

भाक्रा-नागल धरणाला भेट देणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन चालवली जाते. हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर नागल आणि भाक्रा दरम्यान ही ट्रेन धावते. भाक्रा नागल धरण पाहण्यासाठी जाणारे लोक या ट्रेनने मोफत प्रवास करू शकतात. (Latest Marathi News)

या ट्रेनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे डबे लाकडापासून बनवलेले आहेत ज्यामध्ये टीटी नाही. ही ट्रेन डिझेलवर धावते आणि दररोज 50 लिटर तेल वापरले जाते. भारताच्या या स्पेशल ट्रेनमध्ये आधी 10 डबे होते, मात्र आता त्यात फक्त तीन डब्बे ठेवण्यात आले आहेत. एक डबा पर्यटकांसाठी तर एक डबा महिलांसाठी राखीव आहे.

लोकांना मोफत प्रवास करता यावा, हा या ट्रेनचा उद्देश आहे. रेल्वेने मोफत प्रवास करण्याचे कारण म्हणजे लोकांना भाक्रा नागल धरण पाहता येईल. हे धरण पाहून आजच्या पिढीतील लोकांना हे समजू शकते की त्याच्या बांधणीत कितीतरी अडचणी आल्या असतील.

ट्रेनचा ट्रॅक बनवण्यासाठी डोंगर कापण्यात आला आहे. ही ट्रेन सुमारे 74 वर्षांपूर्वी 1949 मध्ये सुरू झाली होती. या ट्रेनने दररोज 25 गावांतील सुमारे 300 लोक मोफत प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. भाक्राच्या आसपासच्या गावातील लोक या ट्रेनने प्रवास करतात. तुम्हालाही भाकर नांगल धरण बघायचे असेल तर तुम्ही या ट्रेनने मोफत प्रवास करू शकता. या ट्रेनमध्ये कोणताही फेरीवाला किंवा टीटी राहत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT