नवी दिल्ली : भारतीय नौदलाने (Indian Navy) नौसैनिक अॅन्टीशीप मिसाईलची (Antiship Missile) चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय नौदलाने बुधवारी सीकिंग हेलिकॉप्टरमधून पहिल्या स्वदेशी विकसित नौसैनिक अॅन्टीशीप मिसाईल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही चाचणी ओडिशामधील बालासोर येथील एकीकृत परीक्षण रेंज चांदीपूर मध्ये घेण्यात आली, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय नौदलासाठी विकसित केलेली ही पहिली स्वदेशी हवाई-लाँच केलेली अॅन्टीशीप क्षेपणास्त्र प्रणाली आहे. क्षेपणास्त्राने अचूकतेने लक्ष्य गाठले.
विशेष क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन आणि डीआरडीओने सहकार्य केले. त्याची चाचणी घेतली आहे. ट्विटरवर भारतीय नौदलाने सीकिंग ४२बी हेलिकॉप्टरने क्षेपणास्त्र डागण्याचा एक छोटा व्हिडिओ ट्विट केले आहे. भारतीय नौदल आणि अंदमान आणि निकोबार कमांडने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अॅन्टी शीपची चाचणी घेतल्याच्या एका महिन्यानंतर नवीन क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.(Antiship Missile)
या क्षेपणास्त्रामध्ये अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात हेलिकॉप्टरसाठी स्वदेशी विकसित लाँचर्सचा समावेशही आहे. या क्षेपनास्त्रामध्ये अत्याधुनिक दिशादर्शक यंत्र आहे. ही चाचणी डीआरडीओ ( DRDO) आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिली. या चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय नौदल भारताच्या सागरी सुरक्षा हितांचे, हिंदी महासागर क्षेत्रात प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी आपली एकूण लढाऊ क्षमता वाढवत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौकांचे लोकार्पण केले. आयएनएस ( INS) सुरत आणि आयएनएस ( INS) उदयगिरी ही जहाजे मुंबईतील माझगाव डॉक येथे सुरू करण्यात आली आहेत.(Antiship Missile)
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.